Join us   

निती आयोगाच्या संचालक उर्वशी प्रसाद सांगतात, दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरशी मी लढले पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2024 8:00 PM

NITI Aayog director shares birthday post amid stage 4 cancer battle : उर्वशी प्रसाद यांना एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर झालेला असून देखील या आजाराचा सामाना त्यांनी अतिशय धीराने केला आहे...

अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याची माहिती सांगणारी पोस्ट नुकतीच तिने शेअर केली होती. तिच्या या पोस्टची चर्चा होत असतानाच, NITI आयोगाच्या संचालिका (Urvashi Prasad) उर्वशी प्रसाद (NITI Aayog director’s birthday post on living with stage 4 cancer) यांनी कॅन्सरशी कशी झुंझ दिली, या पोस्टची देखील बरीच चर्चा होताना दिसत आहे. कॅन्सर या आजाराला आजही जगासमोरील एक जीवघेणी मोठी समस्या म्हणून पाहिल जात. पहिल्यांदा जेव्हा कॅन्सर या आजाराची ओळख जगाशी झाली तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कॅन्सर होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कॅन्सर  होतो. पण हळूहळू पोटाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर आणि अनेक कॅन्सरचे प्रकार जगासमोर उलगडू लागले. यामुळेच हे सत्य समोर आले की कॅन्सर कोणालाही आणि कसाही, कधीही होऊ शकतो आणि तेव्हापासून कॅन्सरविषयी जास्त भीती निर्माण झाली(NITI Aayog Director Urvashi Prasad, Opens Up On Lung Cancer Diagnosis).

सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कधी कधी कॅन्सर होऊनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तस तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कॅन्सरवर बरेच उपचार सुद्धा आले आहेत. असे असले तरीही अजूनसुद्धा लोकांमध्ये कँसरबद्दल जागरुकता नाही किंवा त्यांना त्याबद्दल काही माहिती नाही. त्याच दृष्टीने थोडी जागरुकता निर्माण करावी यासाठी NITI आयोगाच्या संचालिका उर्वशी प्रसाद (Dr. Urvashi Prasad, Director NITI Ayog) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कँसर झालेला असताना देखील त्याचा बाऊ न करता त्याच्याशी कसे दोन हात केले याबद्दलची माहिती शेअर केली आहे(With Stage 4 Cancer, NITI Aayog Director Urvashi Prasad).

नुकताच २ जुलै २०२४ या दिवशी उर्वशी प्रसाद यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, कॅन्सर सोबत जगताना प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करताना त्यांना कसे वाटते हे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. कॅन्सर हा एक वेदनादायक आजार आहे, ज्याचा सामना करणे सोपे नाही.

उर्वशी प्रसाद यांनी देखील या आजाराचा सामाना अतिशय धीराने केला आहे. त्या म्हणतात, मला कॅन्सर सारखा गंभीर आजार झालेला असून देखील हा एवढा मोठा आजार अजूनही माझा धीर मोडू शकला नाही. आपला वाढदिवस साजरा करताना त्या म्हणाल्या, हा खास दिवस म्हणजे कॅन्सरवर मात करून मोठ्या कठीण टप्प्यातून बाहेर येण्याच्या उत्सवाचा दिवस आहे.  

उर्वशी आपल्या पोस्टमध्ये शेअर करत म्हणतात,  स्टेज ४ कॅन्सरसोबत जगताना प्रत्येक वर्षी हा दिवस मला खूप खास दिवस वाटतो. यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला मला तो दिवस खास वाटतो. कँसर झाला म्हणून इतर जसे विचार करतात तसाच विचार न करता, तोच तो स्टिरीओटाइप विचार न करता मी खूप मोठ्या धैर्याने व धाडसाने या माझ्या प्रवासाचा स्विकार केला आहे. एवढंच नव्हे तर, मी माझ्या अपेक्षांना आव्हान करते तर येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देते. आज फक्त माझाच वाढदिवस नाही तर, हा खास दिवस म्हणजे कॅन्सरवर मात करून मोठ्या कठीण टप्प्यातून बाहेर येणाऱ्यांच्या उत्सवाचा दिवस आहे. अडथळे, समस्या यांना तोंड देत त्यांना आनंदाने सामोरे जाऊन, आरोग्य, आनंद यांचा स्वीकार करण्याचे आणखीन एक वर्ष आहे. असे म्हणत त्यांनी वाढदिवसाचे तीन फोटो देखील पोस्ट केले आहेत.

या शेअर केलेल्या एका फोटो मध्ये त्यांनी पुष्पगुच्छ हातात धरला आहे तर दुसऱ्या फोटोत त्या केकवरची मेणबत्ती विजवताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत त्यांनी केकवरची चॉकलेटची क्रिम हातात सिगार सारखी धरून फोटो काढला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी म्हटले आहे की ही चॉकलेट सिगार आहे, खरी सिगार नाही ! 

उर्वशी प्रसाद या NITI आयोगाच्या संचालक आहेत. त्या एक दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्ण आहेत ज्याला ALK पॉझिटिव्ह फुफ्फुसाचा कॅन्सर (Urvashi Prasad Shares Insights on ALK Lung Cancer) असे म्हणतात म्हणतात. फुफ्फुसांचा कॅन्सर झाला की त्या व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. श्वास घेण्यात अडचण निर्माण होते, हाडे आणि सांधे दुखु लागतात. खूप अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. ही या कॅन्सरची काही प्राथमिक लक्षणे आहेत.

टॅग्स : कर्करोगआरोग्यहेल्थ टिप्सकॅन्सर जनजागृती