Join us   

मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे मुलांसाठी घातक, २ आजारांचा धोका, तज्ज्ञ सांगतात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 9:07 AM

Parenting Tips: तुमच्याही मुलांना किंवा तुम्हाला स्वत:ला मोठ्या आवाजात टीव्ही पाहण्याची, गाणी ऐकण्याची सवय असेल तर बघा त्याचे किती वाईट परिणाम होऊ शकतात...(noise creates bad impact on mental and physical health of children)

ठळक मुद्दे यामध्ये ५ ते १२ वर्षे या वयोगटातील ५०० मुलांचा अभ्यास केला गेला. त्या मुलांना वेगवेगळ्या पातळीवरचे अनेक आवाज ऐकविण्यात आले.

टीव्ही, मोबाईल अशी उपकरणं आता प्रत्येक घराघरांत आहेत. बहुतांश जणांच्या घरामध्ये तर असतेच पण कारमध्येही साऊंड सिस्टिम असते. त्यामुळे घरात, गाडीत मुलं किंवा त्यांचे पालक गाणी ऐकतात. टीव्हीचा वापर तर जवळपास सगळ्यात घरात होतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो जरुर करा. पण गाणी ऐकताना किंवा टीव्ही पाहताना त्याच्या आवाजाची पातळी कुठवर चढते आहे याकडे मात्र कटाक्षाने लक्ष द्या, असं तज्ज्ञ सांगतात. बहुतांश घरांमध्ये खूप मोठा आवाज करून टीव्ही पाहिला जातो किंवा गाणी ऐकली जातात. पण असं करणं मुलांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याचा मुलांच्या मानसिक, शारिरीक आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो, याविषयीचा एक अभ्यास नुकताच करण्यात आला आहे. (noise creates bad impact on mental and physical health of children)

 

झीन्यूज यांनी दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीमधील हेमहोल्ट्ज सेंटर फॉर एन्व्हार्नमेंट रिसर्च येथे याविषयीचा एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये ५ ते १२ वर्षे या वयोगटातील ५०० मुलांचा अभ्यास केला गेला. त्या मुलांना वेगवेगळ्या पातळीवरचे अनेक आवाज ऐकविण्यात आले.

हेल्मेटमधून खूपच घाण वास येतो? बघा हेल्मेट स्वच्छ करण्याचे २ सोपे उपाय- दुर्गंधी होईल गायब 

आणि त्यांना त्याचवेळी वेगवेगळी कामं, अभ्यास करायला सांगितला गेला. त्यातून असं दिसून आलं की जी मुलं नेहमीच गाेंधळ किंवा कर्कश्श आवाज असणाऱ्या भागात आहेत, त्या मुलांची कामं, अभ्यास अर्धवट झालेला होता. कारण त्यांना तशी एकाग्रताच तिथे मिळाली नाही. तसेच ती मुलं अनेक गोष्टी करायला विसरली. म्हणजेच विसरभोळेपणाही त्यांच्यात वाढत गेला.  

 

यातूनच अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला आहे की कायम मोठमोठाले आवाज ऐकल्याने डोक्यावर ताण निर्माण होतो. यामुळे एकाग्रता कमी होतेच पण मुलांमधला चिडचिडेपणाही वाढतो.

महागड्या टॉयलेट क्लीनरवर पैसे घालविण्यापेक्षा 'हा' उपाय करा- बाथरुमच्या टाईल्स, बेसिन लख्ख चमकेल

त्यांना लवकर मानसिक थकवा येतो. अशी मुलं अर्थातच अभ्यासात कमी पडतात. त्यामुळे मुलांचं मोठ्या आवाजात टीव्ही पाहणं, गाणी ऐकणं लवकरच कमी करण्याची गरज आहे, असं या अभ्यासावरून दिसून येतं. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलंपालकत्व