Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्दी- पडसं होऊन नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात १ सोपा उपाय 

सर्दी- पडसं होऊन नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात १ सोपा उपाय 

Health Tips: हिवाळ्यात किंवा एरवीही कधी सर्दी झाली की हा त्रास सगळ्यांनाच होतो. म्हणूनच असं झालं तर नेमकं काय करायचं, हे एकदा बघून ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 02:14 PM2022-12-30T14:14:05+5:302022-12-30T14:14:51+5:30

Health Tips: हिवाळ्यात किंवा एरवीही कधी सर्दी झाली की हा त्रास सगळ्यांनाच होतो. म्हणूनच असं झालं तर नेमकं काय करायचं, हे एकदा बघून ठेवा.

Nose choke up due to cold? suffering from breathing problem due to cold and cough | सर्दी- पडसं होऊन नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात १ सोपा उपाय 

सर्दी- पडसं होऊन नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात १ सोपा उपाय 

Highlightsकफ साचून नाक बंद व्हायला सुरुवात होते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. विशेषत: काही जणांना तर रात्री झोपल्यानंतर हा त्रास खूपच जाणवतो.

हिवाळा सुरू झाला की घरोघरी सर्दी- पडसं होऊन हैराण झालेली एक तरी व्यक्ती असतेच. घरात एकदा कुणाला सर्दी झाली की हळूहळू हा संसर्ग सगळ्यांपर्यंतच जातो. सर्दी झाल्यावर सुरुवातीला एक- दोन दिवस आपण शिंका, नाक गळणे यामुळे हैराण  असतो. त्यानंतर मात्र कफ साचून नाक बंद (Nose choke up due to cold?) व्हायला सुरुवात होते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. विशेषत: काही जणांना तर रात्री झोपल्यानंतर हा त्रास खूपच जाणवतो. म्हणूनच अशा वेळी नाक मोकळं (breathing problem due to cold and cough) करण्यासाठी नेमकं काय करायचं, ते बघूया..(home remedies)

सर्दीमुळे नाक बंद झालं असल्यास घरगुती उपाय
हा उपाय इन्स्टाग्रामच्या hirayogi या पेजवर शेअर करण्यात आला आहे. फक्त ३ स्टेप्समध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे.

सलग दोनदा ICC क्रिकेटर ऑफ दि इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळविणारी स्मृती मानधना! बघा तिची उत्तुंग भरारी

यामध्ये आपण बोटांच्या साहाय्याने नाकाच्या आसपास असणाऱ्या त्वचेवर मालिश करणार आहोत. त्यामुळे नाक मोकळं होऊन श्वास घेण्यास नक्कीच मदत होईल.

 

१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे दोन्ही हाताच्या तर्जनीचा वापर करून दोन्ही नाकपुड्यांचे जे गालाच्या जवळचे टोक आहे, त्याच्यावर दाब द्यावा. ही क्रिया १० वेळा करावी.

नव्या वर्षात बिंधास्त जगायचं, टेंशनला ठोकायचाय रामराम? मग २०२२ सोबत ५ सवयींनाही म्हणा बाय-बाय

२. वरील पहिली क्रिया करून झाली की त्यानंतर नाकाच्या दोन्ही बाजूला तर्जनी खाली- वर याप्रमाणे हलवत मालिश करावी. ही क्रिया देखील एकूण १० वेळा करावी.

 

३. वरील दोन्ही क्रिया झाल्यानंतर ही एक शेवटची क्रिया. यामध्ये डोळ्याचा जो नाकाच्या बाजूचा कोपरा असतो, त्याच्याखाली नाकाचे एक हाड असते. या हाडापासून गालाच्या उंचवट्यापर्यंत तर्जनीचा वापर करून मालिश करावी. ही क्रिया दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १०- १० वेळा करावी. या तिन्ही क्रिया केल्यानंतर नाक मोकळे झाल्यासारखे जाणवेल. 

 

 

Web Title: Nose choke up due to cold? suffering from breathing problem due to cold and cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.