कोरफड आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. कोरफड आपल्या केसांची आणि त्वचेची निगा राखते. हिरव्या रंगाच्या कोरफडीबद्दल आपल्याला माहितीच असेल. त्यातील गुणधर्म आपल्यासाठी किती फायदेशीर आहे. हे आपण सर्वच जाणतो. मात्र, आपल्याला लाल रंगाच्या कोरफडीबद्दल माहिती आहे का ? लाल कोरफडीचे फायदे अनेक आहेत. या कोरफडीचे पान देखील लाल असतात. लाल कोरफड जितकी दुर्मिळ तितकीच फायदेशीर आहे. लाल कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ॲसिड सारखे अँटीऑक्सिडंट आढळतात.
मधुमेह राहते नियंत्रणात
एका संशोधनानुसार, लाल कोरफडीचा रस प्यायल्याने साखर नियंत्रणात राहते, त्यात इमोडिन आढळते, जे ग्लुकोज कमी करण्यास मदत करते. यासोबतच ते इन्सुलिन देखील वाढवते, यासाठी कोरफडीच्या पानांचा रस बनवून त्याचे सेवन करा.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
लाल कोरफडीचा रस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते.
त्वचेसाठी वरदान
त्वचेसाठी लाल कोरफड वरदान आहे. लाल कोरफडीमध्ये असे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे वृद्धत्व चेहऱ्यावर दिसून येत नाही यासह त्वचेला टवटवीत ठेवते. मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी लाल कोरफड उपयुक्त आहे, त्याच्या वापराने कोंडा देखील दूर होऊ शकतो.
डोकेदुखीसाठी गुणकारी
कोरफड हे नैसर्गिक वेदनाशामक औषध म्हणून काम करते. हे स्नायूंना आराम देते यासह वेदनेच्या जागी सूखदायक प्रभाव देते. लाल कोरफड हे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
मासिक पाळीतील वेदना कमी होते
आजकाल महिलांना मासिक पाळीमुळे त्रास होतो, अशा परिस्थितीत लाल कोरफडीचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे मासिक पाळी दरम्यान वेदना आणि क्रॅम्पमधून आराम मिळू शकतो.