Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कितीही गोळ्या, औषध खाऊन अ‍ॅसिडिटी जात नाही ? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगते ४ सोपे उपाय...

कितीही गोळ्या, औषध खाऊन अ‍ॅसिडिटी जात नाही ? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगते ४ सोपे उपाय...

Rujuta Suggests 4 -Easy Hacks to Combat Acidity, Headache and Gas Due to Delayed Lunch : अ‍ॅसिडिटीचा त्रास हा कित्येकांच्या डेली रुटीनचा भाग असला तरीही, हा त्रास कमी करण्यासाठी कशी घरगुती पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 12:24 PM2023-09-28T12:24:22+5:302023-09-28T12:46:39+5:30

Rujuta Suggests 4 -Easy Hacks to Combat Acidity, Headache and Gas Due to Delayed Lunch : अ‍ॅसिडिटीचा त्रास हा कित्येकांच्या डेली रुटीनचा भाग असला तरीही, हा त्रास कमी करण्यासाठी कशी घरगुती पर्याय...

Nutritionist Rujuta Diwekar Lists Down Simple Remedies To Alleviate Acidity. | कितीही गोळ्या, औषध खाऊन अ‍ॅसिडिटी जात नाही ? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगते ४ सोपे उपाय...

कितीही गोळ्या, औषध खाऊन अ‍ॅसिडिटी जात नाही ? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगते ४ सोपे उपाय...

संतुलित आहार व जेवणाच्या वेळा पाळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. जर आपण अवेळी, काहीतरी अरबट - चरबट खाल्ले तर अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास होतो. आपल्यापैकी बऱ्याचजणांना अ‍ॅसिडिटीचा त्रास (Relieve from Acidity) हा कायम बारमही असतो. कामाच्या व जेवणाच्याही अनियमित वेळा, धावपळीचे डेली रुटीन, बदलती लाइफस्टाइल, जागरण, बदललेले आहाराचे स्वरूप यांमुळे अपचन किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास (Treat Acid Reflux Naturally) होणे हा अनेकांच्या डेली रुटीनचाच एक भाग झाला आहे. हायपर अ‍ॅसिडिटी होऊन छातीत जळजळणं, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या इतर समस्या देखील डोकं वर काढतात(How To Get Rid Of Acid Reflux Permanently).

रोजच्या आहारात अतितेलकट, मसालेदार, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी वाढते. रोजच्या जेवणामध्ये काही बदल केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करता येऊ शकतो. यासोबतच ताजा आणि आरोग्यदायी आहार घेतल्यास अ‍ॅसिडिटीवर सहज मात करता येते. अ‍ॅसिडिटीची वाढती समस्या आपल्या शरीर व आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे अ‍ॅसिडिटीवर वेळीच योग्य (Getting rid of acidity) उपाय करणं गरजेचं आहे, नाहीतर वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. रोज होणाऱ्या या अ‍ॅसिडिटीपासून सुटका (Acidity Problems? 4 Home Remedies That Can Help) करून घेण्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरने (Rujuta Diwekar) आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर ३ पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे(Acidity Home Remedies: 4 quick remedies to get rid of acidity).
 

अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर नेमकं काय सांगते ? 

१. खाण्याच्या वेळेत जास्त अंतर नसावे :- सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरने दोन खाण्याच्या वेळात जास्त अंतर न ठेवण्याचा मुख्य सल्ला दिला आहे. बरेचजण कामाच्या धावपळीत अनेकदा जेवणाच्या वेळा चुकवतात किंवा जेवण स्किप करतात, अशी चूक करु नका. आपण अनेकदा सकाळचा नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणापर्यंत काहीच खात नाही, असे करणे चुकीचे आहे. सकाळच्या नाश्त्यानंतर व दुपारच्या जेवणाच्या दरम्यान मध्ये काहीतरी खावे. पोट अगदीच उपाशी ठेवू नये. सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण यात फार अंतर ठेवू नका. वेळेवर खा, आपल्याला भूक लागली आहे याचे संकेत वेळेवर ओळखा तरच अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

२. सकाळी भिजवलेल्या मनुका खा :- दिवसाची सुरुवात करताना भिजवलेले मनुके व बेदाणे खावेत. रात्रभर मनुका, बेदाणे पाण्यात भिजवावेत आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी मनुका व बेदाणे त्या पाण्यासोबतच खावेत. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता होत नाही आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या निर्माण होत नाहीत. मनुकांमध्ये असणारे फायबर आणि लोह पोटाला शांत ठेवते आणि भूकही नियंत्रित ठेवते.

आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

गरोदरपणात व्यायाम करावा का आणि केला तर कोणता? व्यायाम करणं गरोदर मातेसाठी फायद्याचं की त्रासाचं?

३. गुलकंद खा :- सतत होणाऱ्या अ‍ॅसिडिटीसाठी गुलकंद खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. एक ग्लास पाण्यांत एक चमचा गुलकंद घालून हे पाणी रात्री झोपताना किंवा दिवसभरात आपण कधीही पिऊ शकता. यामुळे अपचन, अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे यांसारख्या समस्या कमी होण्यास फायदेशीर ठरते. बऱ्याचदा जेवणात तिखट पदार्थ खाल्ल्याने किंवा चुकीच्या वेळी जेवल्याने छातीत जळजळ होते, अ‍ॅसिडिटी अधिक होऊ लागते अशावेळी गुलकंदाचे हे पाणी पिण्याने अ‍ॅसिडिटी पटकन कमी होण्यास मदत मिळते. शरीरामध्ये अधिक उष्णता झाली असेल तर ती कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

  वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

४. मिड - मीलमध्ये खा दही पोहे :- आपल्याला बरेचदा दोन खाण्याच्या वेळांमध्ये भूक लागते. अशावेळी आपण काहीतरी पॅकेजिंग फूड किंवा फास्ट फूड खातो. अशा मधल्या वेळेच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी पौष्टिक व हेल्दी  निवडावा. १ वाटी पोहे घ्या आणि ते पाण्यात भिजवून धुवा. त्यानंतर या ओल्या पोह्यांमध्ये घरचे लावलेले दही घालून घ्यावे. त्यामध्ये चिमूटभर काळे मीठ अर्थात सैंधव मीठ मिक्स करा, त्यात हिरव्या मिरची कुटून घाला. साधारण सकाळी ११ वाजता किंवा संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान भूक लागते तेव्हा आपण हा हेल्दी नाश्ता करु शकता. यामुळे पोट शांत राहाते आणि अ‍ॅसिडिटी होत नाही. भूक लागली असल्यास हा पौष्टिक व हेल्दी नाश्ता उत्तम पर्याय आहे.

Web Title: Nutritionist Rujuta Diwekar Lists Down Simple Remedies To Alleviate Acidity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.