Join us   

कोण म्हणतं प्रोटीन महागच, ऋजुता दिवेकर सांगतात ‘हे’ पदार्थ खा-प्रोटीन मिळेल भरपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 4:56 PM

Nutritionist Rujuta Diwekar Shares Five Essential Food : पोषणतज्ज्ञ रूजूता दिवेकर यांनी अलिकडेच त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळताहेत की नाही याची खात्री आपण करायला हवी. आपण आपल्या पोषणाचे सेवन काळजीपूर्वक करायला हवे. प्रथिनांचे सेवन अत्यावश्यक आहे ज्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत होते आणि शरीराला आवश्यक पोषक  तत्व मिळतात. पोषणतज्ज्ञ रूजूता दिवेकर यांनी अलिकडेच त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Nutritionist Rujuta Diwekar Shares Five Essential Food Items To Eat For Protine Intake)

ज्यात तुम्ही नैसर्गिक स्त्रोतांपासून आपल्याला लागणारी दैनंदिन प्रोटीन्स कसे मिळवता येतील याबाबत सांगितले आहेत. पोषण तज्ज्ञांनी 5 अत्यावश्यक नैसर्गिक स्त्रोतांबद्दल  सांगितले आहे ज्यामुळे शरीराला प्रथिनं मिळतात. पोषणतज्ज्ञांनी ५ अत्यावश्यक नैसर्गिक स्त्रोतांबद्दल सांगितले आहेत. ज्यामुळे शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून  काढण्यास मदत होईल. 

१) शेंगा आणि कडधान्य

आपल्या व्हिडिओमध्ये रूजूता यांनी सांगितले आहे की अनेकदा आपण कडधान्य खाण्यावर अधिक लक्ष देतो. चपाती आणि तांदूळ यांसारखे कार्बोहायड्रेट्स खाणं सोडून देतो. पण जेव्हा आपण असे करतो तेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळण्यापासून प्रतिबंधित करता येते. 

२) डाळ

डाळ हा प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा एक पदार्थ आहे. डाळी खाल्ल्यानं शरीराला प्रोटीन्स मिळतात. तुम्हाला वरणाच्या स्वरूपात डाळ आवडत नसेल तर तुम्ही डाळ पराठाही खाऊ शकता. तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल त्यात डाळी घालू शकता. 

३) ड्रायफ्रुट्स

आहारात बदाम, अक्रोडचा समावेश करा. चणे किंवा शेंगदाणेही तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता.  रूजूता दिवेकर यांनी सांगितले की, पौष्टीक प्रथिनांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही लहान आरोग्यदायी बदल करू शकता

४) दुग्धजन्य पदार्थ

अन्नाचे हे कुटुंब प्रोटीन्सनी परिपूर्ण आहे तुम्ही दिवसातून एकदा तरी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करायला हवे.  सकाळी १ ग्लास दूध पिणं असो किंवा दुपारच्या जेवणात दही भात खाणं असो आपण रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करायला हवा. 

5) जर तुम्ही मांसाहारी पदार्थांचा आहारात समावेश करत असाल तर ते ही खाऊ शकता. अन्यथाना शाकाहारी पदार्थांमधूनही तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल