Join us   

पाळीचा खूप त्रास होतो, अनियमित येते? चहात 'हा' पदार्थ मिसळून प्या- डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 2:14 PM

Nutritionist Suggests To Drink This 3 Ingredients :मासिक पाळी येण्यापूर्वी हा हर्बल चहा प्या, पाळीत होणारे त्रास होतील कमी.

महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्या अनेकदा छळतात.  कधी पाळी लवकर येते तर कधी महिनोंमहिने पाळी येत नाही. वजन वाढलं म्हणून पाळी येत नाही तर कधी हार्मोनल त्रास असतो. (Health Tips) पिरिएड्स क्रॅम्प्सचाही अनेकींना त्रास होतो. त्या वेदना कमी करण्यासाठी  करायला हवेत. (Natural Home Remedies to Menstruation) पिरिएड्सशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी आपली जीवनशैली, क्रॅश डाएट, खाण्यापिण्यात पोषक तत्वांचा अभाव, ताण-तणाव आणि अनहेल्दी सवयी हे सारंही बदलायला हवं. पिरीएड्सचा त्रास कमर करण्यासाठी न्युट्रिशनिस्टनं सांगितलेला हा उपाय करुन पाहा.. (Nutritionist Suggests To Drink This 3 Ingredients Tea For Irregular Periods)

इंस्टाग्रामवर डॉ. अमिनी हसन यांनी आपल्या अकाऊंटवर मासिक पाळी वेळेत येण्यासाठी उपाय शेअर केला आहे.  अनियमित पिरिएड्सबद्दल सांगितले आहे.  हर्बल चहा बनवताना पिरिएड्स सुरू होण्याच्याआधी किंवा पिरिएड्ससच्या दरम्यान  पिऊ शकता.

हा चहा बनवण्यासाठी एक ग्लास पाण्याला भांड्यात काढून उकळण्यासाठी ठेवा. त्या पाण्यात १ चमचा बडिशेप आणि एक चमचा हळद घाला.  हा चहा उकळल्यानंतर एका कपमध्ये  काढून ठेवा.  हा चहा प्यायल्याने अनिमियत परिएड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

लादी पुसण्याच्या पाण्यात 'ही' वस्तू मिसळा; चकाचक होईल फरशी, एकही डास घरात शिसणार नाही

टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल आणि क्रॅम्प्सही उद्भवणार नाहीत. औषधी गुणांनी परिपूर्ण चहा प्यायल्यानं शरीरातील एंटी इंफ्लेमेटररी गुण मिळतात. शरीर डिटॉक्स होईल. हॉर्मोन्ल बॅलेंन्स करण्यासाठी चहा एक ते २ दिवस पिऊ शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स