Join us

कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात? न्यूट्रिशनिस्टनी सांगितली नावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:32 IST

Stomach Health: न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात.

Stomach Health: रिकाम्या पोटी ज्या गोष्टींचं आपण सेवन करतो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. असे बरेच पदार्थ, भाज्या किंवा फळं आहेत ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन न करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकतं. अशात न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ!

रिकाम्या पोटी काय खाऊ नये?

कच्च्या भाज्या

न्यूट्रिशनिस्ट साक्षी यांच्यानुसार कच्च्या रिकाम्या पोटी खाणं टाळलं पाहिजे. कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. अशात रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाल्ल्या तर पोट फुगणे, गॅस तयार होणे अशा समस्या होऊ शकतात.

योगर्ट 

योगर्टही रिकाम्या पोटी काणं टाळलं पाहिजे. योगर्टमध्ये हेल्दी प्रोबायोटिक्स असतात, पण जर रिकाम्या पोटी याचं सेवन केलं तर पोटातील अ‍ॅसिड हे गुड प्रोबायोटिक्स नष्ट करतं. त्यामुळे योगर्ट रिकाम्या पोटी सेवन करू नये.

कॉफी 

ब्लॅक कॉफी किंवा दुधाची कॉफी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटात अ‍ॅसिड वाढतं. यामुळे अ‍ॅसिडिटी, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि हार्टबर्न या समस्या होऊ शकतात. त्याशिवाय पोटात अस्वस्थता सुद्धा जाणवते. त्यामुळे कॉफी रिकाम्या पोटी सेवन करू नये.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये टॅनिन अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जर टोमॅटो रिकाम्या पोटी खाल्लं तर याने पोटातील अ‍ॅसिड वाढतं आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. अशात एक्सपर्ट टोमॅटो रिकाम्या पोटी न खाण्याचा सल्ला देतात.

केळ

केळीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. जर केळ रिकाम्या पोटी खाल्लं तर याने शरीरात हे दोन्ही खनिज प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. अशात शरीराचं संतुलन बिघडतं आणि हृदयासंबंधी समस्या वाढू लागतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य