Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > न्यूट्रिशनिस्टनं दिला हिवाळ्यात रोज आंघोळ न करण्याचा सल्ला, जाणून घ्या कारण...

न्यूट्रिशनिस्टनं दिला हिवाळ्यात रोज आंघोळ न करण्याचा सल्ला, जाणून घ्या कारण...

Bathing Tips : फिजिओ आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. रेबेका पिन्टो यांचं मत वेगळं आहे. त्यांनी सांगितलं की, थंडीच्या दिवसात आंघोळ न केल्यानं तुम्हाला फायदे मिळू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:24 IST2025-01-01T10:23:42+5:302025-01-01T10:24:18+5:30

Bathing Tips : फिजिओ आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. रेबेका पिन्टो यांचं मत वेगळं आहे. त्यांनी सांगितलं की, थंडीच्या दिवसात आंघोळ न केल्यानं तुम्हाला फायदे मिळू शकतात.

Nutritionist told not to bath in winter to increase life expectancy | न्यूट्रिशनिस्टनं दिला हिवाळ्यात रोज आंघोळ न करण्याचा सल्ला, जाणून घ्या कारण...

न्यूट्रिशनिस्टनं दिला हिवाळ्यात रोज आंघोळ न करण्याचा सल्ला, जाणून घ्या कारण...

Bathing Tips : रोजच्या जगण्यातील एक महत्वाचं काम म्हणजे आंघोळ. जवळपास सगळ्याच लोकांच्या दिवसाची सुरूवात आंघोळीपासून होत असेल. शरीरावरील कीटाणू, घाम, मळ आंघोळीच्या माध्यमातून निघून जातो आणि फ्रेश वाटतं. अशात रोजची कामेही सुरळीत करण्यास मदत मिळते. याच कारणानं रोज आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. 

मात्र, फिजिओ आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. रेबेका पिन्टो यांचं मत वेगळं आहे. त्यांनी सांगितलं की, थंडीच्या दिवसात आंघोळ न केल्यानं तुम्हाला फायदे मिळू शकतात. इतकंच नाही तर आंघोळ टाळली तर संभावित आयुष्यही वाढवलं जाऊ शकतं. हा दावा आमचा नाही तर डॉ. रेबेका यांचा आहे.

आयुष्य वाढवण्याचा फंडा?

सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचं आयुष्य वाढावं. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर कदाचित ही माहिती तुमच्या कामात येऊ शकते. कारण डॉ. रेबेका यांचं मत आहे की, थंडीच्या दिवसात आंघोळ न केल्यानं संभावित आयुष्य ३४ टक्क्यांनी वाढवलं जाऊ शकतं.

वैज्ञानिक कारण...

सायन्सनुसार हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी इम्यून सिस्टमला जास्त मेहनत करावी लागते. या दिवसात रोज आंघोळ केल्यानं त्वचेवरून नॅचरल ऑइल निघून जातात. ज्यामुळे ड्रायनेस आणि इन्फ्लामेशन होऊ शकतं. एक दिवसाचा गॅप देऊन आंघोळ केली तर त्वचेला मायक्रोबायोम डायव्हर्सिटीला सपोर्ट मिळतो. 

पाण्याचं तापमान

हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, आंघोळीच्या पाण्याच्या तापमानावर लक्ष दिलं पाहिजे. थंडीत थंड वातावरणामुळे सर्दी-खोकला होऊ शकतो. तसेच जास्त गरम पाण्यानं आंघोळ केली तर खाज आणि रॅशेजची समस्या होऊ शकते.
 

Web Title: Nutritionist told not to bath in winter to increase life expectancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.