कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून, हात वारंवार धुण्यावर किंवा स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. स्वच्छ न करता हाताने तोंडाला स्पर्श करणं धोक्याचं आहे. बहुतेक संक्रमण आपल्या हातांद्वारे तोंड, डोळे किंवा नाकापर्यंत पोहोचतात आणि अनेक रोगांना कारणीभूत ठरतात. नखे चावणे ही एक वाईट सवय आहे हे आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकले आहे. असे असूनही ही सवय अनेकांमध्ये दिसून येते. नखं चावणं गंभीर ओमिक्रॉन संसर्गाचे कारण ठरू शकते.
एका संशोधनानुसार, जगभरातील 30% लोकांना नखे चघळावे लागतात. ही सवय जर वेळीच थांबवली नाही तर ती आपल्या दिनचर्येत इतकी सामावून जाते की आपण आपली नखे कधी चावायला सुरुवात केली ते आपल्याला कळतही नाही. म्हणूनच या वाईट सवयीकडे वेळीच लक्ष देऊन त्यापासून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
नखं चावण्याची सवय साधारण ४ ते ६ वर्षांच्या मुलांमध्ये दिसून येते. वेळेवर रोखलं नाही तर ती सवय आयुष्यभरही राहू शकते. अनेकजण ताणतणावाखाली असताना नखं चावताना दिसून येतात. नखं चावण्याची सवय शारीरिक आरोग्यासह, मानसिक आरोग्यासाठीही नुकसानकारक ठरू शकते.
नखं चावण्याची कारणं
डिप्रेशन, एंग्जायटी, बोअर होणं, उदासिनता वाटणं, एकाग्रतेची कमतरता, ओसिडी, एडीएचडी
नखांमुळे लोक आजारी का पडतात?
आपली नखं बॅक्टेरियांचे घर असते. म्हणूनच नखं चावणारे लोक जास्त आजारी पडतात. नखं चावल्यानं हानीकारक बॅक्टेरीयाज तोंडापर्यंत पोहोचतात. याशिवाय कम्यूनिकेबल डिजीजसुद्धा होतात.
पचनक्रियेवर परिणाम
नखं चावल्यानं खराब बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करतात याचा परिणाम पचनक्रियेवर होऊन गॅस्टोइंस्टेस्टायनल इंन्फेक्शनचा सामना करावा लागतो.
हिरड्यांमध्ये वेदना
अनेकदा नखं चावताना हिरड्यांमध्ये नखांचा काही भाग अडकतो. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना आणि रक्तस्त्रावही होऊ शकतो. तर कधी दात तुटतात. लहानपणी जर नखं चावण्याची सवय सोडली नाही तर दात वाकडे तिकडे येऊ शकतात. सतत नखं चावल्यानं दातांचा आकार बदलू शकतो. या सवयीमुळे तुम्हाला ब्रेसेसुद्धा लावण्याची गरज भासू शकते.
नखं चावण्याची सवय कशी सोडायची?
जर तुम्ही नखांची व्यवस्थित काळजी घेतली तर चावण्याची सवय लागणार नाही. त्यासाठी नखांमधली घाण वेळच्यावेळी काढून नखं कापत जा. नेलपेंट कडवट चवीची असते जेव्हा तुम्ही नेहमी नखांना नेलपेंट लावाल तेव्हा आपोआप नखं चावणं बंद होईल. रेग्यूलर मेनिक्यूअर करा. जर तुम्ही तुमच्या नखांवर खर्च करत असाल तर नखं चावण्याची सवय आपोआप सुटेल.