कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूचा घातक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. (Omicron Preventions) जर तुम्हाला त्याची कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब तपासणी करा. हिवाळ्यात फ्लू आणि सर्दी लक्षणांचा धोका जास्त असतो, त्यामुळे या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका. (CoronaVirus Omicron Varient Prevention)
तज्ञांच्या मते, ओमिक्रॉन हा कोरोनाचा असा एक प्रकार आहे, ज्याचा लसीकरण झालेल्या लोकांवर देखील परिणाम होत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला आहात किंवा तुम्हाला सौम्य लक्षणे आहेत. तर वेळीच चाचणी करून घ्या.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
CDC नुसार, तुम्हाला ताप किंवा थंडी, खोकला, धाप लागणे किंवा श्वास घेण्यात अडचण, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी, चव किंवा वास कमी होणे, घसा खवखवणे, नाक वाहणे, मळमळ किंवा उलट्या होत असल्यास आणि तत्काळ तपासणी करा. तुम्हाला डायरियासारखी लक्षणेही जाणवू शकतात. तज्ज्ञांचे असे मत आहे की, कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर पाच दिवसांनी किंवा लगेच लक्षणे दिसू लागताच चाचणी करा. रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत स्वतःला वेगळं ठेवा. याशिवाय लक्षणे जाणवत असली, त्यानंतरही रिपोर्ट निगेटिव्ह येत असेल, तर पुन्हा पुन्हा टेस्ट करून घ्या.
स्वत:ला वेगळं ठेवा
सीडीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्यानंतर दोन ते १४ दिवसांत कोरोना विषाणूची लक्षणे दिसू शकतात. हेच कारण आहे की तुम्ही प्रथम चाचणी करा आणि नंतर स्वतःला वेगळे करा. जरी काही लोकांना लक्षणे जाणवत नाहीत. अशा स्थितीत ते नकळतपणे व्हायरस पसरवू शकतात.
सुरूवातीचे २- ३ दिवस सर्तक राहा
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 चे संक्रमण अनेकदा लक्षणे दिसू लागल्यानंतर एक ते दोन दिवस आधी किंवा दोन ते तीन दिवसांनी होते. सीडीसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लक्षणं नसलेले लोक पॉझिटिव्ह परिणाम येण्यापूर्वी कमीतकमी दोन दिवस सांसर्गिक मानले जाते.
तज्ज्ञांच्या मते, ज्यांना वाटते की त्यांना कोरोना झाला आहे किंवा त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. जर तुम्हाला दम लागणे, सतत छातीत दुखणे, जागे राहण्यास असमर्थता, फिकट गुलाबी किंवा निळी त्वचा आणि नखे अशी लक्षणे जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.