Join us

Omicron variant news : ओमायक्रॉनशी लढण्याची क्षमता कमी करतात 'हे' पदार्थ; वाचा इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 13:33 IST

Omicron variant news : कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतरही रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास आजाराची तीव्रता कमी प्रमाणात जाणवू शकते.

ओमायक्रॉन वेरिएंटची जवळपास १७०० पेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास ओमायक्रॉनपासून बचाव करता येऊ शकतो. कोरोनापासून बचावासाठी मास्क लावण्याचे, वेळोवेळी हात धुण्याचे आवाहन केलं जात आहे. जर तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोरोनाच्या कोणत्याही वेरिएंटचा  सामना करू शकता. कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतरही रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास आजाराची तीव्रता कमी प्रमाणात जाणवू शकते. जर तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर रोजच्या आहारातील काही पदार्थ वगळून काही हेल्दी पदार्थांचा समावेश करायला हवा.   (Things that may weaken your immune system covid-19 omicron delta varient)

भाज्या आणि फळांचे भरपूर सेवन

फळं आणि भाज्या शरीराला संक्रमणापासून लढण्यास मदत करतात. पांढऱ्या रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. फ्रेश फळं,  भाज्या जिंक, बीटा- कॅरोटीन, व्हिटामीन ए, सी सारख्या पोषक तत्वांनी भरपूर असतात. ज्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. प्लांट बेस्ड अन्नाचे सेवनकेल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत करते. 

झोपेची कमतरता

पुरेश्या प्रमाणात झोप घेतली नाही तर व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. जर तुम्ही व्यवस्थित झोप घेत नसाल तर रिकव्हर होण्यासही वेळ लागू शकतो. वेबएमडीच्या रिपोर्टनुसार आपलं शरीर आजारांपासून बचाव करणारं आणि आजारांशी लढणारं प्रोटिन म्हणजे  एंटीबॉडी तयार करू शकत नाही.  झोपल्यानंतर सायटोकाईन्स नावाचे प्रोटिन रिलिज होते ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणूनच ७ ते ८ तासांची झोप घ्यायलाच हवी.

धुम्रपान

सिगारेट, तंबाखू यांमुळे शरीराची व्हायरल, बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता कमी होते.  त्यांतील केमिकल्समुळे इम्यूनिटी रिस्पांस कमी होऊ लागतो. म्हणून आजार टाळण्यासाठी धुम्रपान, मद्यपानापासून लांब राहावे. 

हाय फॅट डाएट

हाय फॅट डाएटमधील तेल पांढऱ्या पेशींच्या उत्पन्नात बाधा आणतात. हाय फॅट डाएट तुमच्या आतड्यातील बॅक्टेरीयाजचे संतुलन बिघडवू शकते.  आहारात हाय फॅट, एक्स्ट्रा शुगर असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे. 

व्हिटामीन डी चा अभाव

मजबूत हाडे आणि निरोगी रक्त पेशींसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे आणि ते व्हिटॅमिन डी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला आजारांशी लढण्यास मदत करते. फॅटी फिश, ट्यूना, मॅकेरल आणि सॅल्मन, व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न जसे की काही डेअरी उत्पादने, संत्री, सोया दूध आणि धान्य, चीज आणि अंडी, भुईमूग यांचा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता. 

ताण तणाव

तणाव आणि चिंता 30 मिनिटांत तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात. दीर्घकालीन तणावामुळे फ्लू, इन्फेक्शन आणि इतर विषाणूंपासून संरक्षण करणे कठीण होते. जर तुम्ही ताण तणाव कमी करू शकत नसाल तर योगा करा किंवा ध्यान करा. अन्यथा रोगप्रतिकारक शक्ती सतत कमी होत जाईल. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्या