Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोप येण्याचा ‘वन टू का थ्री’ फार्म्युला, गाढ-शांत झोपेसाठी सोपा आणि असरदार उपाय...

रात्री झोप येण्याचा ‘वन टू का थ्री’ फार्म्युला, गाढ-शांत झोपेसाठी सोपा आणि असरदार उपाय...

3-2-1 Formula For Better Sleep : A Simple & Effective Solution For Deep & Restful Sleep : रात्री लवकर झोपच लागत नसेल तर हा ३ - २ - १ हा फॉर्म्युला नक्की वापरुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2023 01:36 PM2023-02-13T13:36:22+5:302023-02-13T13:42:18+5:30

3-2-1 Formula For Better Sleep : A Simple & Effective Solution For Deep & Restful Sleep : रात्री लवकर झोपच लागत नसेल तर हा ३ - २ - १ हा फॉर्म्युला नक्की वापरुन पाहा.

'One two three' night sleep formula, a simple and effective solution for deep and restful sleep... | रात्री झोप येण्याचा ‘वन टू का थ्री’ फार्म्युला, गाढ-शांत झोपेसाठी सोपा आणि असरदार उपाय...

रात्री झोप येण्याचा ‘वन टू का थ्री’ फार्म्युला, गाढ-शांत झोपेसाठी सोपा आणि असरदार उपाय...

'आरोग्य हीच खरी संपत्ती’ असे म्हटले जाते. चांगले आरोग्य मिळविण्यासाठी आपण व्यायाम, चांगला आहार अशा गोष्टी करत असतो. याचबरोबर आरोग्य चांगले  राहण्यासाठी झोपही तितकीच महत्वाची असते. प्रत्येक माणसाने किमान सात ते आठ तासांची चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली झोप आपल्याला केवळ तणावापासून दूर ठेवत नाही तर आपले शरीर निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. अनेक जणांना झोप न येण्याची किंवा शांत झोप न लागण्याची समस्या असते.

दिवसभर कितीही थकून आले तरीही अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. जर झोप नीट झाली नाही किंवा झोप न येण्याच्या समस्या असतील तर याचा विपरित परिणाम आरोग्यावर होतो. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होते, आळस - सुस्ती येते, कामात लक्ष लागत नाही यांसारख्या इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे रात्री शांत व गाढ झोप लागावी यासाठी आपल्याला साधा सरळ ३ - २ - १ हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. या उपयुक्त फॉर्म्युलाने आपल्याला रोज रात्री चांगली झोप लागेल व सकाळी फ्रेश वाटून दिवस चांगला जाईल(3-2-1 Formula For Better Sleep : A Simple & Effective Solution For Deep & Restful Sleep).

नेमका काय आहे हा ३ - २ - १ फॉर्म्युला.... 

१. झोपायच्या ३ तास आधी काहीच खाऊ नका :- रात्रीचे जेवण किंवा झोपण्यापूर्वी जर आपण फारच हेव्ही किंवा अगदी पोट भरून जेवण केलं असेल तर त्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतोच. झोपण्यापूर्वी असा जड आहार घेतल्यास अपचन, छातीत जळजळ किंवा पचनाबाबत इतर समस्या उद्भवतात. शक्यतो रात्री हलका आहारच घ्यावा. रात्री हेव्ही आहार घेण्यासोबतच जर आपण खूप उशिरा जेवत असाल तर ते देखील आपल्याला झोप न येण्याचे मुख्य कारण असू शकते. रात्री उशिरा जेवल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी - जास्त होते; याचा परिणाम थेट आपल्या झोपेवर तसेच आपल्या एकूणच आरोग्यावर होतो. दिवसभरातील आपले शेवटचे खाणे झोपण्याच्या वेळेच्या ३ तास आधी घेणे केव्हाही चांगले आहे.

२. झोपायच्या २ तास आधी द्रव पदार्थ पिणे टाळा :- झोपायच्या आधी जास्त पाणी प्यायल्याने रात्रीच्या वेळी वारंवार लघवी करण्यासाठी जावे लागते. ज्यामुळे आपल्या झोपत व्यत्यय येऊ शकतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर नैसर्गिकरित्या शरीरातील लघवीचे उत्पादन कमी करते, यामुळे आपल्याला वारंवार लघवीसाठी न जाता कित्येक तास सलग शांत झोपता येते. याउलट जर आपण झोपायच्या आधी भरपूर प्रमाणात पाणी प्यायलो, तर आपले शरीर लघवी तयार करत राहील. ज्यामुळे आपल्याला वारंवार उठून लघवीला जावे लागेल. यासाठी झोपायच्या २ तास आधी पाणी किंवा इतर द्रव पदार्थ पिणे टाळा. परंतु दिवसभरात आपण भरपूर पाणी पीत आहोत याची खात्री करा.

  

३. झोपायच्या १ तास आधी स्क्रिन पाहू नका :- झोपायच्या १ तास आधी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्क्रिन पाहणे टाळा. आपल्या शरीरातील मेलाटोनिन नावाचा हार्मोन्स हा आपल्या झोपेचे नियमन करतो. आपल्याला व्यवस्थित झोप येण्यासाठी हा हार्मोन्स फारच महत्वाचा असतो. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्क्रिनमधून एक प्रकारच्या निळ्या रंगांचे प्रकाश उत्सर्जित करत असतात. या निळ्या रंगांचे रेज आपल्या शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्सचे उत्पादन करण्याचे थांबवतात. परिणामी झोप लागणे कठीण होऊन झोपेची पद्धत विस्कळीत होऊ शकते.


चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करावेत... 

१. नियमित व्यायाम करावा - पुरेसा व्यायाम आणि शारीरिक हालचालींमुळे शरीर थकते. त्यामुळे रात्री लगेच व शांत झोप लागते. 

२. दिवसा झोपणे टाळावे - दिवसा झोप घेतल्याने रात्री जागरण करावे लागते. यासाठी रात्री चांगली झोप येण्यासाठी दिवसा झोप घेणे टाळावे.  

३. मानसिक ताण घेऊ नका - ताणतणाव, चिंता, अतिविचार यामुळे झोप उडते. त्यामुळे चांगली झोप लागण्यासाठी असा कोणताही मानसिक ताण घेऊ नका. झोपण्यापूर्वी आवडती पुस्तके वाचणे, दीर्घ श्वास घेणे, ध्यान करणे हे उपाय उपयुक्त ठरू शकतात. 

४. दररोज वेळेवर झोपावे - रोजची झोपण्याची वेळ निश्चित करावी. रोज रात्री ठराविक वेळेला झोपण्याची व ठराविक वेळेला उठण्याची सवय लावावी. यामुळे झोप पूर्ण होते आणि झोपेसंबंधीच्या तक्रारी दूर होतात. 

५. बेडरुममध्ये झोपेचे वातावरण असावे - चांगली झोप येण्यासाठी बेडरुम शांत असावी. तसेच आरामदायक बेड व चादरी, उशी कव्हर्स स्वच्छ धुतलेले फ्रेश असावे. यामुळे आराम वाटून लगेच झोप लागण्यास मदत होते.

Web Title: 'One two three' night sleep formula, a simple and effective solution for deep and restful sleep...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.