Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > 'आई गं पोट दुखतंय' असं मुलं नेहमीच म्हणतात? द्या पोटदुखी गायब करणारं 'हे' खास औषध 

'आई गं पोट दुखतंय' असं मुलं नेहमीच म्हणतात? द्या पोटदुखी गायब करणारं 'हे' खास औषध 

How To Get Quick Relief From Stomach Ache In Kids: पोट दुखतंय अशी तक्रार मुलांची नेहमीच असते. त्यासाठीच हा एक घरगुती उपाय बघून ठेवा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 19:03 IST2025-02-07T17:32:40+5:302025-02-07T19:03:08+5:30

How To Get Quick Relief From Stomach Ache In Kids: पोट दुखतंय अशी तक्रार मुलांची नेहमीच असते. त्यासाठीच हा एक घरगुती उपाय बघून ठेवा.. 

Onion Juice for Stomach Ache Relief, how to get quick relief from Stomach Ache in kids | 'आई गं पोट दुखतंय' असं मुलं नेहमीच म्हणतात? द्या पोटदुखी गायब करणारं 'हे' खास औषध 

'आई गं पोट दुखतंय' असं मुलं नेहमीच म्हणतात? द्या पोटदुखी गायब करणारं 'हे' खास औषध 

Highlightsहा उपाय केल्यानंतर कॉन्स्टिपेशन, गॅसेस, पोटात आग होणे, मुरडा येणे असे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

काही अपवाद सोडले तर जवळपास बहुतांश आईंना हा अनुभव असतोच की महिन्यातून २- ३ वेळा तरी मुलं आई ग माझं पोट दुखतंय असं म्हणत असतात. यामध्ये बऱ्याचदा शाळेत, ट्युशनला, क्लासला जायचं नाही म्हणूनही मुलं पोट दुखण्याचा बहाणा करत असतात. पण असे काही मजेशीर अपवाद सोडले तर बऱ्याच मुलांना पोट दुखण्याची समस्या असते. कारण ते व्यवस्थित जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, कोरडं अन्न खाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि शिवाय त्यात ते व्यवस्थित पाणीही पीत नाहीत. काही मुलांना जंताचा त्रास असतो (Ayurvedic Home Remedies). त्यामुळेही मग पोटदुखी होतेच.(How To Get Quick Relief From Stomach Ache In Kids?)

 

मुलांचं पोट दुखत असल्यास घरगुती उपाय

आता तुमची मुलंही वारंवार असंच म्हणत तुमच्याकडे पोट दुखण्याविषयी तक्रार करत असतील तर नेमका काय उपाय करावा याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dietitianshreya या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

वजन कमी करायचंय, पण डाएट करणं अवघड जातं? डॉक्टर सांगतात 'हा' उपाय- वजन उतरेल भराभर

व्हिडीओमध्ये त्या सांगत आहेत की एक मध्यम आकाराचा कांदा घ्या आणि तो कापून त्याची टरफलं काढून टाका. त्यानंतर कांदा बारीक किसून घ्या. 

त्यानंतर कांद्याचा किस हाताने पिळून किंवा एखाद्या कपड्यात बांधून त्याचा रस काढा. साधारण १ टेबलस्पून कांद्याचा रस असावा. 

 

एक ग्लास पाण्यात १ चमचा कांद्याचा रस घाला. त्यात थोडंसं मीठ आणि एक चमचा मध घालून हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि ते मुलांना प्यायला द्या. 

गॅस लायटर खराब झालं की फेकून देता? फक्त २९८ रुपयांत घ्या रिचार्जेबल लायटर, जे टिकेल वर्षानुवर्षे

त्यानंतर एखाद्या तासासाठी तरी मुलांना बाकीचं काही खायला देऊ नका. हा उपाय केल्यानंतर कॉन्स्टिपेशन, गॅसेस, पोटात आग होणे, मुरडा येणे असे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात. मोठ्या माणसांसाठीही हा उपाय फायदेशीर आहे.


 

Web Title: Onion Juice for Stomach Ache Relief, how to get quick relief from Stomach Ache in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.