Join us   

दात किडले, हिरड्यांमधून रक्त येतं? साधा आजार की ओरल कॅन्सरची लक्षणं, डॉक्टर सांगतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 12:39 PM

Oral Health Care Tips : अनेक संशोधनातून समोर आलं आहे की चांगली ओरल हायजिन कॅन्सर आणि डायबिटीससारख्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.

दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फ्लॉसिंग आणि ब्रश योग्य पद्धतीनं करणं महत्वाचं असतं. फ्लॉसिंग दातांच्या रोजच्या स्वच्छतेचा एक भाग आहे. (Oral Health Care Tips) फ्लॉसिंगमुळे अशा ठिकाणचे पार्टिकल्स बाहेर निघण्यास मदत होते जिथे आपले हात पोहोचू शकत नाहीत ब्रशिंग, फ्लोसिंगमुळे फ्रेश आणि ताजे श्वास घेता येतात. यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. (Mouth cancer Symptoms and causes)

अनेक संशोधनातून समोर आलं आहे की चांगली ओरल हायजिन कॅन्सर आणि डायबिटीससारख्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. डेंटर केअरचे चीफ क्लिनिकल ऑफिसर डॉ. विमल अरोरा यांनी एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार  Oral hygiene tips and tricks) ओरल हायजीनमुळे गंभीर आजारांपासून लांब राहण्यास मदत होते.

एका संशोधनात हिरड्यांचे आजार आणि काही प्रकारच्या कॅन्सर जसं की पॅन्क्रीयाटिक आणि इसोफेजियल कॅन्सरमध्ये घनिष्ठ संबंध दिसून आला. संशोधनानुसार बॅड ओरल हायजीन हिरड्यांमध्ये गंभीर सूज तयार करू शकते.  यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. तज्ज्ञ सांगतात की जे लोक दात आणि हिरड्यांची स्वच्छ व्यवस्थित करत नाहीत त्यांच्या तोंडात बॅक्टेरियाज तयार होतात. ते कॅव्हिटीज तर की श्वासांच्या दुर्गंधीचं कारण ठरतात.  वेळीच लक्ष न दिल्यास दात किडू शकतात.

धुम्रपान आणि जास्त  दारू पिणं तोंडाच्या कॅन्सरच्या समस्या वाढवू शकते. २ ते ३ वेळा १०० ते १२० सेकंदासाठी ब्रश करायला हवं. दातांना मजबूत बनवण्यासाठी तुम्ही फ्लोराईड टूथपेस्ट आणि स्वच्छ ब्रिसल्स असलेल्या टुथब्रथचा वापर करू शकता. दातांव्यवतिरिक्त जीभ स्वच्छ करायला विसरू नका. काहीही खाल्ल्यानंतर फ्लोसिंग करा.

१) चेकअप आणि क्लिनिंग नियमित करा. डेंटिस्टकडे जाऊन रेग्युलर डेंटल चेकअप करा आणि दातांच्या समस्या वाढण्यापासून रोखा

२) दिवसभरात खूप पाणी प्या. यामुळे तोंड हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे हिरड्या आणि दातांचे आजार टळू शकतात.

३) माऊथवॉशचा वापर करा. यामुळे श्वास ताजे राहण्यास मदत होईल. या टिप्स फॉलो करून तुम्ही दीर्घकाळ दात आणि हिरड्या सडण्यापासून रोखू शकता. इतकंच नाही कॅन्सर आणि डायबिटीससारख्या गंभीर समस्याही रोखता येतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य