Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीक रुग्णांमध्ये वाढतोय 'पेरिओडोन्टायटीस'चा आजार; वेळीच तोंडाच्या स्वच्छतेची 'अशी' घ्या काळजी

डायबिटीक रुग्णांमध्ये वाढतोय 'पेरिओडोन्टायटीस'चा आजार; वेळीच तोंडाच्या स्वच्छतेची 'अशी' घ्या काळजी

Oral Health & Diabetes : मधुमेह असलेल्या प्रत्येक दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे निदान होत नाही. मधुमेह आणि रक्तातील साखरेचे बिघडलेले प्रमाण या गोष्टींची तपासणी होण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 03:55 PM2021-08-27T15:55:23+5:302021-08-27T16:10:47+5:30

Oral Health & Diabetes : मधुमेह असलेल्या प्रत्येक दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे निदान होत नाही. मधुमेह आणि रक्तातील साखरेचे बिघडलेले प्रमाण या गोष्टींची तपासणी होण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.

Oral Health & Diabetes : Dental care options for patients with diabetes | डायबिटीक रुग्णांमध्ये वाढतोय 'पेरिओडोन्टायटीस'चा आजार; वेळीच तोंडाच्या स्वच्छतेची 'अशी' घ्या काळजी

डायबिटीक रुग्णांमध्ये वाढतोय 'पेरिओडोन्टायटीस'चा आजार; वेळीच तोंडाच्या स्वच्छतेची 'अशी' घ्या काळजी

Highlightsतोंडाच्या आरोग्याच्या गंभीर समस्या आणि मधुमेह या दोन्ही गोष्टी नकळत वाढत जातात व त्या लक्षात येण्यासाठी लक्षपूर्वक देखरेख ठेवणे गरजेचे असते.साखरेच्या पातळीवर चांगले नियंत्रण असल्यास पेरिओडोन्टल आजाराचा धोका आणि दातांची अधिक हानी होण्याचा धोका कमी होतो व पेरिओडोन्टल उपचारांमुळे साखरेच्या पातळीमध्ये सकारात्मक सुधारणा होते. 

घरोघरच्या महिलांसह पुरूषांचेही कामाच्या व्यापात  वैयक्तीक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वाढत्या वयात मधुमेह, रक्तदाबासंबंधी समस्या  उद्भवत जातात. अशा स्थितीत या गंभीर आजारांना लागून उद्भवणारे लहान मोठे आजार टाळण्याासाठी वैयक्तीक स्वच्छता खासकरून ओरल हेल्थकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. डायबेटीस मेलिटल (डीएम) हा एक विविध कारणांमुळे उद्भवणारा आजार असून तो रक्तप्रवाहामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असणे म्हणजे हायपरग्लासेमियाच्या स्वरूपात होतो.

टाइप २ डीएमचे निदान सर्वसाधारणपणे ४०-६० या वयामध्ये होते, पण आशियाई लोकसंख्येमध्ये दशकभर आधीच हा आजार जडू शकतो. दुस-या एखाद्या आजारासाठी केलेल्या चेक-अपमधून किंवा विम्यासाठीच्या तपासण्या करून घेताना किंवा नोकरीसाठी रुजू होण्यापूर्वीच्या वैद्यकीय तपासणीमधून किंवा अशाच अन्य कारणांमधून मधुमेह असल्याचे आढळून येते.

आज घडीला ४६३ दशलक्ष प्रौढ व्यक्ती मधुमेहासोबत जगत आहेत आणि जगाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येमध्ये अशा व्यक्तींचे प्रमाण ९.३ टक्‍के इतके आहे. कन्सल्टन्ट डायबेटोलॉजिस्ट डॉ. मनोज चावला (Lina Diabetes Care & Mumbai Diabetes Research Centre) यांनी डायबिटीसमुळे वाढणारे आजार रोखण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. 

गेल्या काही दशकांमध्ये या स्थितीबाबत अधिकाधिक जागरुकता निर्माण होताना दिसत आहे. नियमित व्यायाम करणे, आहारात बदल करणे अशा जीवनशैलीतील बदलांच्या रूपात ही गोष्ट दिसून येत आहे. त्याच्या सोबतीने रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियमित देखरेख ठेवणे आणि वेळोवेळी फिजिशियन्सचा सल्ला घेणे या गोष्टीही केल्या जात आहेत. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर चांगले नियंत्रण असण्याचे अनेक फायदे आहेत आणि मधुमेहामधून उद्भवणा-या गंभीर व दीर्घकालीन गुंतागुंतीना प्रतिबंध करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे.

या आजाराचे निदान होण्यास होत असलेला उशीर हा मात्र आजच्या काळाचा अधिक गंभीर प्रश्न आहे. मधुमेह असलेल्या प्रत्येक दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे निदान होत नाही. मधुमेह आणि रक्तातील साखरेचे बिघडलेले प्रमाण या गोष्टींची तपासणी होण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. साखरेच्या प्रमाणावर चांगले नियंत्रण मिळविण्यामध्ये तोंडाचे आरोग्य आणि स्वच्छता यांचीही महत्त्वाची भूमिका असते त्याविषयी लोकांमध्ये जागरुकता आणण्याची गरज आहे.

तोंडाचे आरोग्य आणि स्वच्छता

 मधुमेहग्रस्तांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यामुळे तोंडामध्ये लाळ येण्याचे प्रमाण कमी होते व तोंड कोरडे पडल्यासारकं वाटतं. यामुळे दातांत प्लाक तयार होतात आणि परिणामी दात किडतात व त्यांत कॅव्हिटीज तयार होतात. दिवसातून दोनदा ब्रश करण्यासारख्या तोंडाची स्वच्छता राखणा-या गोष्टी मधुमेहग्रस्तांचा धोका आणखी कमी करू शकतात.

पीरिओडोन्टायटीस

पीरिओडोन्टायटीस हा बॅक्टेरियांमुळे होणारा आणखी एक आजार आहे, ज्याच्यामुळे दात किडू शकतात व गमवावे लागू शकतात. मधुमेह आणि पेरिओडोन्टायटीस हे आजार एकमेकांशी संबंधित आहेत. पेरिओडोन्टायटीसवरील उपचारांमुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींच्या पचनशक्तीमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते व साखरेच्या पातळीवर नियंत्रण राखता येऊ शकते.

तोंडाचे आरोग्य आणि मधुमेह यांच्यामधील हे दुहेरी नाते ही एक सकारात्मक गोष्ट आहे, कारण त्यामुळे दोन्ही आजारांचा धोका एकाच वेळी कमी करता येतो व एकाचवेळी दोन्ही समस्यांची काळजी घेता येते. सध्या उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांतून हे सिद्ध झाले आहे की, साखरेच्या पातळीवर चांगले नियंत्रण असल्यास पेरिओडोन्टल आजाराचा धोका आणि दातांची अधिक हानी होण्याचा धोका कमी होतो व पेरिओडोन्टल उपचारांमुळे साखरेच्या पातळीमध्ये सकारात्मक सुधारणा होते. 

पेरिओडोन्टिस्ट्स, डेन्टिस्ट्स आणि डायबेटोलॉजिस्ट आणि फिजिशियन्स यांनी एकमेकांशी समन्वय साधल्याने मधुमेहासाठी आवश्यक ती माहिती मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. या विविध प्रकारच्या फिजिशियन्सना  रक्तातील साखरेच्या पातळीची माहिती असेल तर रुग्णाला  उपचार मिळू शकतात.

अगदी मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्येही पेरिओडोन्टायटिसची समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम त्यांच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर होण्याचा धोकाही असतो. म्हणूनच तोंडाच्या आरोग्यावर आणि साखरेच्या पातळीवर एकत्रितपणे देखरेख ठेवणे महत्त्वाचे आहे. पेरिओडोन्टायटिसचे व्यवस्थापन हे प्रत्येक व्यक्तीगणिक वेगवेगळे असायला हवे. त्यात औषधे आणि त्यांची मात्रा यांतील बदल, रक्तातील साखरेचे मूल्यमापन आणि अँटीबायोटिक्सचा वापर या सर्व गोष्टींचे फिजिशियन्सकडून नियोजन केले गेले पाहिजे.

तोंडाच्या आरोग्याच्या गंभीर समस्या आणि मधुमेह या दोन्ही गोष्टी नकळत वाढत जातात व त्या लक्षात येण्यासाठी लक्षपूर्वक देखरेख ठेवणे गरजेचे असते. तोंडाचे आरोग्य हे साखरेवर चांगले नियंत्रण राखण्यामध्ये योगदान देणारा आणि फायदेशीर घटक आहे.

दात व हिरड्या निरोगी असणे, तोंडाची विशेष काळजी घेण्यासाठी लागणा-या उत्पादनांचा वापर या गोष्टी तोंडाची स्वच्छता चांगली राखली जात असल्याचे संकेत आहेत, पण त्याचबरोबर मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखण्यास मदत करणारे व त्यांच्या जीवनमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणारी उपाययोजना म्हणून काम करणारे महत्त्वाचे संरक्षक घटकही आहेत. 

Web Title: Oral Health & Diabetes : Dental care options for patients with diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.