Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांमध्ये गॅप, दात पुढे म्हणून तुमचं हसूच गायब झालंय? ‘असं’ करा स्माईल डिझायनिंग..

दातांमध्ये गॅप, दात पुढे म्हणून तुमचं हसूच गायब झालंय? ‘असं’ करा स्माईल डिझायनिंग..

स्माइल डिझायनिंगसाठी फार पैसा खर्च करु शकत नाही अशी अनेकांची समस्या असते. मात्र ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्सने ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 04:30 PM2024-11-09T16:30:56+5:302024-11-09T16:32:43+5:30

स्माइल डिझायनिंगसाठी फार पैसा खर्च करु शकत नाही अशी अनेकांची समस्या असते. मात्र ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्सने ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे

orthosquare clinic care now pay later, dental chain and importance of smile designing | दातांमध्ये गॅप, दात पुढे म्हणून तुमचं हसूच गायब झालंय? ‘असं’ करा स्माईल डिझायनिंग..

दातांमध्ये गॅप, दात पुढे म्हणून तुमचं हसूच गायब झालंय? ‘असं’ करा स्माईल डिझायनिंग..

Highlights त्या क्लिनिकमधील हजारो रुग्णांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमार्फत झीरो कॉस्ट इएमआय देऊ करण्यात आला आहे. 

आपले दात एकसारखे आणि छान असावेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. मात्र कधी ते खूप पुढे असतात तर कधी एकदम वेडेवाकडे. कधी हसल्यावर आपला हिरड्यांचा भाग खूप मोठा दिसतो. या गोष्टींमुळे आपला आत्मविश्वासही कमी होण्याची शक्यता असते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता हे सगळे दुरुस्त करणे आता शक्य झाले आहे. यालाच स्माईल डिझायनिंग म्हटले जाते. सध्या बऱ्याच ठिकाणी ही ट्रीटमेंट केली जात असून ऑर्थोस्क्वेअरच्या रिजनल डिरेक्टर आणि सेलिब्रिटी डेंटीस्ट सायली जाधव कु़डाळकर यांनी या अत्याधुनिक ट्रिटमेंटविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

स्माइल डिझायनिंगसाठी फार पैसा खर्च करु शकत नाही अशी अनेकांची समस्या असते. मात्र 'बजाज फिनान्स', ‘सेव्हइन’, 'शॉप से' यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स यांच्यासोबत करार केला असून त्याद्वारे आता ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आधी तपासणी, उपचार करून घ्या आणि नंतर उपचारांचे पैसे भरा अशी सवलत ग्राहकांना मिळते आहे.
ऑर्थोस्क्वेअर अंतर्गत देशभरात १०० पेक्षा जास्त डेंटल क्लिनिक आहेत. त्या क्लिनिकमधील हजारो रुग्णांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमार्फत झीरो कॉस्ट इएमआय देऊ करण्यात आला आहे. 


स्माईल डिझायनिंग म्हणजे नक्की काय ? 

स्माईल डिझायनिंगमध्ये दातांचा आकार, रंग, ठेवण यांमध्ये बदल केले जातात. दात खूप पुढे, वेडेवाकडे किंवा दातांमध्ये जास्त गॅप आहे अशावेळी ही ठेवण बदलण्यासाठी ट्रीटमेंट केली जाते. यात सगळ्यात आधी दातांचा आकार थोडा वाढवला जातो. मग त्यावर लेन्सेसप्रमाणे एक बारीक लेअर कायमसाठी लावला जातो. सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे दातांवर क्राऊन म्हणजे वरुन कॅपप्रमाणे लेअर लावला जातो. हिरड्यांच्या काही शस्त्रक्रियाही यामध्ये केल्या जातात. हिरड्या जर खूप जास्त दिसत असतील, गडद असतील तर त्यावरही ट्रीटमेंट करता येते. यामध्ये दात लहान वाटत असतील तर ते मोठे दिसण्यासाठी उपचार करता येतात तर मोठे असलेले दात लहान करता येतात.

स्माईल डिझायनिंग कितपत त्रासदायक असतं?

स्माईल डिझायनिंग करायला वयाचं बंधन नाही. मात्र त्यासाठी तुमचे दात, हिरड्या यांचे आरोग्य मुळात चांगले असावे लागते. डेंटल ट्रिटमेंट असल्यामुळे त्यात थोडा डिसकम्फर्ट असतोच. पण स्माईल डिझायनिंगमध्ये मात्र फारसा त्रास होत नाही, त्यामुळे या ट्रिटमेंटला आपण पेनलेस ट्रिटमेंट म्हणू शकतो. तसंच ही ट्रिटमेंट झटपट होणारी असल्याने तुम्ही प्रोफेशनल असाल तर तुमच्यासाठी ही ट्रिटमेंट नक्कीच उपयुक्त आहे. पण दातांना तारा लावणे किंवा ब्रेसेस लावताना मात्र थोडा त्रास होऊ शकतो. सर्जिकल ट्रीटमेंट नसल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.

Web Title: orthosquare clinic care now pay later, dental chain and importance of smile designing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.