Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

Packet Juices Are Really Natural?: उन्हाळ्यात काहीतरी थंडगार प्यावं वाटतं म्हणून तुम्हीही सरळ दुकानात जाऊन तिथला पॅकेटबंद ज्यूस घेऊन पिता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 05:54 PM2024-05-13T17:54:11+5:302024-05-13T18:21:58+5:30

Packet Juices Are Really Natural?: उन्हाळ्यात काहीतरी थंडगार प्यावं वाटतं म्हणून तुम्हीही सरळ दुकानात जाऊन तिथला पॅकेटबंद ज्यूस घेऊन पिता का?

packet juices are really natural? How to confirm that packet juice or packet food is natural | पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

Highlightsकोणताही पॅकबंद ज्यूस नॅचरल आहे असे समजून आपण तो घेतो, तेव्हा ही गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की ज्या पदार्थांत कोणताही कृत्रिम पदार्थ वापरलेला नसतो, तेव्हाच तो पदार्थ नॅचरल असतो.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे जेवण कमी आणि थंडगार पेय जास्त असं अनेकांचं होत आहे. या दिवसांत डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पुरेसं पाणी, ज्यूस, सरबत पिण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. म्हणूनच घशाला कोरड पडली की थेट फ्रिज उघडायचं आणि त्यातला दुकानातून आणलेला पॅकेटबंद ज्यूस किंवा सरबत प्यायचं असं तुम्हीही करता का? नॅचरल किंवा नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला आहे... असं म्हणून अशा पॅकेटबंद ज्यूस पाकिटांची हल्ली सर्रास विक्री होत आहे. पण हे ज्यूस किंवा सरबतं खरोखरच नॅचरल आहेत, त्यात इतर कोणतेच प्रिझर्वेटिव्ह नाहीत का हे एकदा तपासायला पाहिजे...

 

कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हणजेच आयसीएमआरने असा इशारा दिला आहे की डबाबंद किंवा पॅक केलेल्या वस्तुंवरील खाद्यपदार्थांच्या वेष्टणावरील माहिती दिशाभूल करणारी असू शकते. अनेक कंपन्या त्यांचे पदार्थ साखरमुक्त असल्याचा, नॅचरल असल्याचा दावा करतात.

आपल्या शरीराला कोणत्या व्हिटॅमिन्स, मिनरल्सची गरज आहे ते कसं ओळखायचं? डॉक्टर सांगतात ५ टिप्स

परंतू त्यात चरबीचे प्रमाण जास्त असू शकते. त्याचप्रमाणे बहुतेक डबाबंद फळांच्या रसांमध्ये फक्त १० टक्के फळांचा लगदा असू शकतो. अशी अनेक उदाहरणेही आयएमसीआरने दिली आहेत. आयएमसीआरने असेही म्हटले आहे की पॅक केलेल्या पदार्थांवरील आरोग्यविषयक दावे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व ते निरोगी असल्याचे पटवून देण्यासाठी असतात. परंतू ते खरोखरच किती निरोगी आहेत, हे ग्राहकांनी तपासून घ्यावे. 

 

म्हणूनच कोणताही पॅकबंद ज्यूस नॅचरल आहे असे समजून आपण तो घेतो, तेव्हा ही गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की ज्या पदार्थांत कोणताही कृत्रिम पदार्थ वापरलेला नसतो, तेव्हाच तो पदार्थ नॅचरल असतो.

आमरस पुरीचा बेत करायचा? बघा १ सोपी ट्रिक- गार झाल्यानंतरही पुऱ्या राहतील टम्म फुगलेल्या

डबाबंद पदार्थांमध्ये फक्त १ किंवा २ टक्केच नैसर्गिक घटक असतात. तरीही त्यांना नॅचरल हा शब्द अगदी सर्रास वापरला जातो. त्यातून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी पॅकेट फूड, ज्यूस घेताना पाकिटावरील घटक, अन्य माहिती वाचावी आणि मगच त्याची खरेदी करावी अशी सूचनाही आयएमसीआरने केली आहे. 


 

Web Title: packet juices are really natural? How to confirm that packet juice or packet food is natural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.