अनेक आजारांचं, आरोग्यविषयक समस्यांचं उत्तर आपल्या आजूबाजूलाच असतं. प्रत्येक छोट्या किरकोळ त्रासावर डॉक्टरांनीदिलेली औषधंच काम करतात असं नाही. काही घरगुती उपायही यासाठी फायदेशीर आहे. सर्दी खोकला, बध्दकोष्ठता, झोप न येणे, हदयात सारखं धडधडणं हे असे त्रास कमी करण्याचं औषध आपल्या स्वयंपाकघरात आहे. दूध आणि खजूर एकत्र करुन खाल्ल्याने बरेच त्रास कमी होतात आणि नंतर पूर्ण बरेही होतात.
छायाचित्र- गुगल
दूध प्यायचं म्हटलं की अनेकांना एकतर कंटाळा येतो किंवा मग दुधात साखर लागते. साखर घालून दूध घेणं ही आरोग्यदायी बाब मानली जात नाही. तज्ज्ञ म्हणतात दुधात साखर घालून पिण्यापेक्षा दुधासोबत किंवा दुधात भिजवून खजूर खाल्ल्यास ते छान तर लागतातच शिवाय अनेक आजरांवर दूध खजूर हे मिश्रण उत्तम काम करतं.
छायाचित्र- गुगल
दूध खजुराचे आरोग्यदायी फायदे
आरोग्य आणि आहार विषयक तज्ज्ञांनी दूध खजुर एकत्र खाण्यापिण्याचा कसा परिणाम होतो हे सविस्तर सांगितलेलं आहे.
1. सर्दी झाल्यावर एक दोन तीन खजूर मध आणि गरम दुधासोबत खावेत. दूध, मध आणि खजूर हे यांच्या एकत्र सेवनानं जुना खोकला बरा होतो. गरम दुधात थोड मध घालावं. बिया काढून पाच सहा खजूर त्यात घालावेत.हे दूध गरम गरम प्यावं.
2. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी खजूर उपयुक्त मानले जातात. थोडे खजूर घ्यावेत. ते दोन चार तास दुधात भिजवावेत. याच दुधात थोडं केशर आणि इलाची घालावी. एक छोटा चमचा किसलेलं अद्रक घालावं. आणि हे मिश्रण प्यावं. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.
3. अनेक लोकांना अनिद्रेचा त्रास असतो. म्हणजे सकाळी त्यांना खूप झोप येत असते. आणि रात्री अंथरुणावर पडलं की झोपच लागत नाही. अशा समस्येत 2-3 खजूर गरम दुधासोबत किंवा गरम दुधात मिसळून खावेत.
छायाचित्र- गुगल
4. हदयाशी निगडित समस्या उद्भवायला विशिष्ट वयच लागतं असं काही नाही. हल्ली तर तरुणांमधेही हदयाशी निगडित अनेक आजार होतात. हदयाशी संबंधित आजारांचा धोका टाळण्यासाठी दूध, खजूर आणि मध हे मिश्रण उत्तम काम करतं. छातीत खूप धडधडत असेल तर दोन खजूर, दोन चमचे मध आणि अर्धा ग्लास दूध प्यावं. धडधड अणि अस्वस्थता थांबते,
5. सध्याच्या धावपळीच्या जगण्यात आहाराची गुणवत्ता खूपच घसरली आहे. त्याचा परिणाम आता पचन संस्थेवर होवून तसे विकार उदभ्वायला लागले आहेत. बध्दकोष्ठता ही समस्या अनेक लोकांमधे आढळते. ही समस्या दूर होण्यासाठी अर्धा लिटर दुधात 5-8 खजूर घालावेत. हे दूध सकाळी रिकाम्या पोटी घ्यावं.