Join us   

मुलं दूध नको म्हणतात? सद्गुरू सांगतात दुधाऐवजी हे ५ पदार्थ खायला द्या, मुलं होतील तंदुरुस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 1:28 PM

Parenting Tips : सद्गुरू सांगतात की मुलांना भरपूर फळं आणि भाज्या खाण्याची सवय लावा.

प्रत्येक मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. काही मुलं दूधाबरोबर इतर खाद्य पदार्थ सहज पचवतात. काहींना दुधाची एलर्जी असते. काहीजण नॉनव्हेजसु्दधा खात नाहीत. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मुलांना जर दुधाची एलर्जी असेल किंवा दूध प्यायला आवडत नसेल त्याऐवजी कोणते पदार्थ खायला देता येतील. याबाबत सांगितले आहे. (Sadhguru Tells About Milk And Meat Allergy In Kids To Deal With It)

सद्गुरू सांगतात की मुलं जर दूध किंवा मीट प्रोडक्टस खात नसतील किंवा त्यांना एलर्जी असेल तर रोजच्या आहारातील असे काही पदार्थ त्यांना खाऊ घालावेत ज्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहील. (Sadhguru Tells About Milk And Meat Allergy In Kids To Deal With It)

मुलांना काय खाऊ घालाल?

सद्गुरू सांगतात की मुलांना भरपूर फळं आणि भाज्या खाण्याची सवय लावा. ताजी फळं आणि भाज्या खाण्याची सवय लावा.  त्यांचे शरीर या हिशोबाने डाएट एडजस्ट करेल. मुलांना दूधाची एलर्जी असेल तर त्यांना  तुम्ही फळं खायला देऊ शकता.  ब्रोकोली, शिमला मिरची,पालक, टोमॅटो, गाजर हे पदार्थ खायला द्या.

मुलांना योगा शिकवा

सद्गुरू सांगतात की मुलांना कमी वयापासूनच योगा करण्याची सवय लावा. मुलांना सुर्य क्रिया किंवा सुर्य नमस्कार करायला सांगा. ज्यामुळे  मुलांचे शरीर निरोगी राहील आणि त्यांना व्यायामाची लवकर सवय लागेल. लाखो लोकांना मुलांना कमी वयात योगा शिकवण्याचा फायदा झाला आहे. 

महिन्याभरात केस १ इंचही वाढत नाहीत; बायोटीनयुक्त ५ पदार्थ खा, लांबचलांब-दाट होतील केस

लहान मुलांमध्ये दुधाच्या एलर्जीची जाणवणारी लक्षणं

किड्स हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या  रिपोर्टनुसार जेव्हा मुलं दूध पितात तेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होणं, घश्यात वेदना, पोटदुथी, उलट्या होणं, डोळ्यांमध्ये सूज, खाज येणं,  डोळ्यांतून पाणी येणं, सूज येणं आणि बीपी कमी होण्याच्या तक्रारी जाणवतात. मुलांना ज्या खाद्यपदार्थांची एलर्जी आहे असे खाद्यपदार्थ खाणं पूर्णपणे बंद करा.

लिव्हर कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षणं; वेळीच ओळखा हे बदल-जीवघेणा आजार टळेल

ही एलर्जी गंभीर स्वरूपाची असते. तुम्ही डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेऊ शकता. मुलांसाठी घरीच शिजवलेले अन्न उत्तम ठरते. मुलांना बाहेरचं खाण्याची इच्छा कमी होईल. कोणत्याही प्रोडक्ट निवडण्याआधी त्यावरच लेबल तपासून घ्या. त्यात दूधाचा वापर केला नसेल असे पाहा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल