Join us   

Peeing mistakes : उन्हाळ्यात महिलांना गंभीर युरिन इन्फेक्शनचा धोका; 4 चुका- लघवीचे आजार हमखास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 1:35 PM

Peeing mistakes :  स्त्री रोग आणि युरोलॉजी एक्सपर्ट स्टर्गियोस डॉमोच्सिस यांच्यामते महिलांच्या  शरीराची रचनाच अशी असते की त्याना वेगवेगळ्या समस्यांचा  सामना करावा लागू शकतो.

दिवसभरात अनेकदा लघवी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही चुकीच्या सवयी धोकादायक ठरू शकतात. यामुळे तुम्हाला गंभीर स्थितीचा सामना करावा लागू शकतो. युरिन पास करताना काही चुका करणं इन्फेक्सन पसरण्याचं कारण ठरू शकते. (Peeing mistakes) स्त्री रोग आणि युरोलॉजी एक्सपर्ट स्टर्गियोस स्टेलियोस डॉमोच्सिस यांच्यामते महिलांच्या  शरीराची रचनाच अशी असते की त्याना वेगवेगळ्या समस्यांचा  सामना करावा लागू शकतो. महिलांचा मुत्रमार्ग लहान असतो. ज्यामुळे बॅक्टेरिया आरामात युरिन पाईपमध्ये प्रवेश करतात. (Peeing mistakes you should avoid as a woman)

बायोमेकेनिकल दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येईल याचा महिलांच्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. ज्या महिलांना युरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागतो त्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. प्रो स्टर्गियोस यांनी द सनशी बोलताना सांगितले की, महिलांना संपूर्ण जीवनात वेगवेगळ्या शारीरिक बदलांचा सामना करावा लागतो. (Urinary Tract Infection Privantions)  जसंही मासिक पाळी, गर्भावस्था आणि मेनोपोज यामुळे युरिनरी ट्रॅक्ट प्रभावित होण्याची शक्यता असते. म्हणूनच लक्षवी करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं जेणेकरून इन्फेक्शनचा सामना करावा लागू नये. (How to Avoid UTI)

लघवीची जागा मागून पुढे पुसणे

प्रा. स्टर्गियोस सांगतात की प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता करताना नेहमी लक्षात  ठेवायला हवं की लघवीची जागा मागून पुढच्या बाजूला पुसू नये. आपल्या एनलमध्ये खूप बॅक्टेरिया असतात. मागून पुढे पुसल्यानं ते बॅक्टेरिया पुढे येण्याचा धोका असतो. यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन वाढल्यानंतर प्रायव्हेट पार्ट्समध्ये जळजळ आणि वेदनांचा सामना करावा लागतो.

चालण्याचा व्यायाम करूनही वजन कमी होत नाहीये? फक्त १५ दिवसात वजन झरझर घटवण्याचं खास डाएट

प्रायव्हेट पार्ट्स जास्त पुसणं

स्टर्गियोस सांगतात की प्रायव्हेट पार्टची साफ सफाई करताना जास्त जोरजोरात पुसू नये. असं केल्यानं तुम्हाला गंभीर स्थितीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे प्रायव्हेट पार्टच्या स्किनवर जळजळ आणि खाज येऊ शकते.

लघवीला जाण्याची वेळ निश्चित करणं

स्टर्गियोस यांचं म्हणणं आहे की युरिन पास करण्यासाठी निर्धारित वेळ ठेवणं धोकादायक ठरू शकतं.  असं केल्यानं ब्लॅडर योग्य पद्धतीनं  युरिन एकत्र करू शकत नाही. साधारपणे ब्लॅडरमध्ये ४०० ते ५०० ml पर्यंत युरिन एकत्र करण्याची क्षमता असते. पण जर तुम्ही दर अर्ध्या किंवा एक तासाला युरिन पास करत असाल तर ब्लॅडर व्यवस्थित काम करत नाही. अनेकदा सतत थोड्या थोड्या वेळानं युरिन पास करण्याची इच्छा होते. 

 केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? स्वयंपाकघरातील ३ उपाय,काळेभोर केस राहतील कायम

लघवी रोखून ठेवणं

ब्लॅडर पूर्ण भरण्याआधीच युरिन पास न करण्याची सवय योग्य नाही. पण जास्त वेळ रोखून ठेवणंही तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. 

जास्त पाणी पिणं

दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी पिणं तुमच्या तब्येतीसाठी चांगले मानले जाते.  जर तुम्ही व्यायाम करत असाल तर दिवसभरातून ६ ते ७ लिटर पाणी पिऊ शकता. काही लोक  स्वत:ला ओव्हर  हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. लिक्विड्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं ब्लॅडरमध्ये जास्त प्रमाणात मुत्र तयार होते आणि सतत लघवीला जावं लागू शकतं. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्त्रियांचे आरोग्य