Join us   

तूप तब्येतीसाठी आवश्यक खरे, पण ताकद हवी म्हणून रोज रोज भरपूर तूप खात असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2023 6:40 PM

People with health issues should avoid ghee : तूप खाल्ले की लगेच रुप येईल असे नाही, पण अतीच खाल्ले तर काही खरे नाही.

भारतीय पदार्थांमध्ये तुपाचा वापर होतो. तूप (Ghee) खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. तुपात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के आणि ई सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. मात्र, अनेक वेळा लोकं तुपाचा वापर प्रत्येक पदार्थात करतात.

तुपाचे सेवन अतिप्रमाणात केल्यास आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीत फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी आढळतात. तूप जास्त प्रमाणात खाल्ल्याने काय होते? खरंच याने गंभीर आरोग्यदायी समस्या निर्माण होतात का?(People with health issues should avoid ghee).

आयुर्वेदानुसार..

दिल्लीचे आयुर्वेदिक डॉक्टर आरपी पाराशर म्हणतात, 'अति तिथे माती ही होतेच. आजकाल बाजारात मिळणारे तूप भेसळयुक्त असतात. त्यामुळे आरोग्यावर धोका निर्माण होऊ शकतो. बाजारातील तुपामध्ये पाम तेलाचा वापर होतो. जे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही.'

साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

गायीचे तूप सर्वोत्तम

डॉ पराशर यांच्या मते, 'गायीचे तूप आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. कारण ते शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. मात्र, गायीचे तूप अतिप्रमाणात खात असाल तर, त्याचेही काही दुष्परिणाम आहेत. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. कारण हे संतृप्त चरबीने समृद्ध असतात. अशा स्थितीत हार्ट ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो. शिवाय फॅटी लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनीही तुपाचे सेवन टाळावे.

वजन कमी करायचंय? मग नियमित ५ मिनिटं उड्या मारा, जंपिंग जॅक करण्याचे ४ फायदे पाहा

तूप खाणं कोणी टाळावं?

ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी तूप कमी प्रमाणात खावे. शिवाय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुपाचे सेवन करावे. जर बॅड कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, तूप खाणे टाळावे. उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या व्यक्तीने जास्त तूप खाल्ल्यास समस्या आणखी वाढू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य