भारतात साडी नेसण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. जास्तीत जास्त महिला सणांच्या दिवशी किंवा खास प्रसंगांना महिला साडी नेसतात. राज्यानुसार, परिसरानुसार, साडीचे फॅब्रिक यानुसार साडी नेसण्याची स्टाईल बदलत जाते. पण प्रत्येक भारतीय महिलेच्या कपाटात साडी असतेच. चुकीच्या पद्धतीनं साडी नेसणंसुद्धा रिस्की ठरू शकतं (Saree Cancer). वर्षानुवर्ष एका विशिष्ट पद्धतीनं साडी नेसल्यास जीवघेण्या कॅन्सरचा (Cancer) धोका उद्भवू शकतो. डॉक्टरांनी अलिकडेच या संदर्भातील माहिती दिली आहे.
बिहार आणि महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या एका रिसर्चदरम्यान ही बाब समोर आली आहे. रिसर्चनुसार भारतातील सर्वाधिक महिला साडी नेसतात ज्यामुळे त्यांना कॅन्सर होऊ शकतो. हा कॅन्सरचा प्रकार स्किन कॅन्सरशी संबंधित आहे. साडी आणि स्किन कॅन्सरचा संबंध कसा, ते समजून घेऊ. (Patna And Maharashtra Doctors Worms Women Wearing Saree Can Lead To Skin Cancer)
एच टी लाईफस्टाईलच्या एका मुलाखतील एचसीजी कॅन्सर सेंटर, बोरीवली येथिल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शना राणे यांनी सांगितले की, ''साडी कॅन्सर हा कॅन्सरचा दुर्मिळ प्रकार असून ज्या महिला रोज साडी नेसतात त्यांना या प्रकारच्या कॅन्सरचा जास्त धोका असतो. ज्या ठिकाणी साडी बांधली जाते. कंबरेचा मधला भाग, या ठिकाणी हा कॅन्सर उद्भवतो. गरमीच्या वातावरणात पेटीकोटची गाठ घट्ट बांधली जाते तेव्हा धूळ, जळजळ, खाज येऊ शकते. ग्रामीण भागात सोई सुविधांच्या अभावामुळे आणि सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानं आजार अधिक वाढत जातो.''
रिसर्च काय सांगतो?
डॉक्टरांना या रिसर्चमध्ये आढळलं की भारतातील महिला साडी नेसण्यासाठी पेटीकोट वापरतात ज्याला परकर असेही म्हणतात. साडी घट्ट बसण्यासाठी पेटीकोटची नाडी घट्ट बांधली जाते. अनेक महिलांना घट्ट बांधण्यामुळे पोटावर व्रण येणं, जखमा येणं असे प्रकारही उद्भवतात पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नाडी खूप खेचून घट्ट बांधल्यामुळे पोटाचा भाग दाबला जातो याबाबत डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे. पेटीकोट घट्ट बांधल्यामुळे त्या ठिकाणी सतत घर्षण होते आणि स्किनवर दबाव पडतो. वारंवार हे होत राहिल्यानं घातक स्किन कॅन्सर होऊ शकतो.
तज्ज्ञांनी या स्थितीला 'पेटिकोट कॅन्सर' किंवा 'साडी कॅन्सर' असं नाव दिलं आहे. त्यांनी या प्रकारच्या कॅन्सरच्या प्रकरणांची अनेक उदाहरणं दिली आहेत. ज्या ठिकाणी घट्ट पेटीकोट बांधल्यामुळे महिलांना स्किन कॅन्सरला तोंड द्यावे लागले आहेत. त्यांनी महिलांना जितकं शक्य होईल तितकं सैल कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. जर साडी नेसत असाल तर पेटीकोट लूज असावा. तुम्ही साडी कशापद्धतीनं घालता त्यावर कॅन्सरचा धोका अवलंबून असतो.
उपाय
पेटीकोट जास्त घट्ट बांधू नका, त्वचेवर इरिटेशन होत असेल तर त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पेटीकोट बांधण्याची जागा वेळोवेळी बदलत राहा. घरी असल्यास लूज अंडरवेअर वापरा जेणेकरून हवा लागेल. घट्ट कपडे वापरणं टाळा, कंबरेवर टाईट बेल्ट किंवा नाडी बांधू नका. स्किनवर सूज, खाज असेल तर त्वरीत डॉक्टरांना दाखवा.