Join us   

मूळव्याध, पचनाच्या त्रासाला कंटाळलात? आहारात आजच सुरण खाणे सुरू करा, हाडेही होतील मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 8:46 PM

Piles Treatment With Elephant Foot Yam : बहुगुणी सुरणाचे जबरदस्त ५ फायदे, मूळव्याधीवर असरदार सोपा उपाय..

चुकीच्या खाण्यामुळे बऱ्याच जणांना मुळव्याधीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात आतड्यांसंबंधीत हालचाली दरम्यान रक्तस्त्राव किंवा तीव्र वेदना यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर गुद्द्वारभोवती नसांमध्ये सूज येते. यावर वेळेस उपचार न घेतल्यास गुदद्वारात वेदना, जखम आणि जळजळ यांसारख्या समस्या वाढू शकतात. रक्तस्त्रावामुळे शरीरात रक्ताची कमतरता देखील भासू लागते. जर आपल्याला यातून सुटका हवी असेल तर, आहारात आजच सुरणाचा समावेश करा. बरेच जण सुरणाची भाजी, भजी, शिवाय इतर पदार्थ तयार करतात.

सुरणामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांचा साठा आढळतो. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ६ सारखी जीवनसत्त्वे देखील असतात. पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, ''सुरणामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या पचनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे एक वरदान आहे. यामुळे याचा आहारात जरूर समावेश करावा''(Piles Treatment With Elephant Foot Yam).

हृदयासाठी फायदेशीर

सुरणामधील पोटॅशियम घटक, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. शिवाय याच्या नियमित सेवनाने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यासह हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.

४ ‘असे’ पदार्थ, जे सकाळी खाल्ले तर चांगले, पण रात्री खाल्ले तर तब्येत बिघडते, असं का?

पचनक्रिया सुधारते

सुरणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. या करणामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीसारखा आजार होत नाही.

कंट्रोलमध्ये राहते ब्लड शुगर

सुरणामध्ये फायबर असते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि मधुमेह टाळण्यास मदत होते. ज्यामुळे इन्शुलिन नियंत्रित राहते, व मधुमेह-संबंधित असलेला धोका कमी करण्यास मदत मिळते.

रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कमजोर होतात? हे संकट टाळायचं तर खा ४ पदार्थ, रक्तप्रवाह राहील सुरळीत

वेट लॉससाठी मदत

सुरणामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय फायबर मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय सुरण खाल्ल्यानंतर पोट गच्च भरलेले राहते.

हाडांसाठी फायदेशीर

सुरणामधील मॅग्नेशियम आणि फॉस्फरस घटक हाडांना मजबूत करण्यास मदत करतात. शिवाय शरीर डिटॉक्सिफाई करण्यात आणि विष-अशुद्धता काढून टाकण्यास मदत करते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य