Join us   

Plastic Content in Food : फुफ्फुसांमध्ये प्लास्टिक जमा करतात रोजच्या खाण्यातील १३ पदार्थ; कधीही होऊ शकतो दम लागण्याचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:46 AM

Plastic Content in Food : सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात फुफ्फुसाच्या सर्व भागांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले.

मायक्रोप्लास्टिक्समुळे (Microplastics in food)  पर्यावरण दूषित होण्याचा आणि काही प्रजातींचा नाश होण्याचा मोठा धोका आहे. परंतु असे पुरावे देखील आहेत की प्लॅस्टिकचे छोटे कण किंवा तुकडे देखील मानवी आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. प्लास्टिकचे कण मानवी रक्त आणि वायुमार्गात प्रवेश करत आहेत.

प्लॅस्टिकचे छोटे कण मानवी आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात यावर सध्या अनेक अभ्यास सुरू आहेत, मात्र हे सूक्ष्म कण फुफ्फुसात राहून त्यांना नुकसान पोहोचवू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांमध्ये  गंभीर आजार उद्भवू शकतात. (Plastic accumulates in the lungs. Shortness of breath can occur at any time)

गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; वेळीच त्रासदायक आजार टाळा

असं मानलं जातं की हे कण जास्त काळ फुफ्फुसात राहू शकतात आणि फुफ्फुसात जळजळ निर्माण करतात. कण किती मोठा आहे हे देखील महत्त्वाचे आहे कारण मोठे कण अधिक हानिकारक असू शकतात. तज्ज्ञांनी एका अभ्यासात सांगितले की रोज वापरल्या जाणाऱ्या कोणत्या वस्तू रक्त आणि फुफ्फुसात मायक्रोप्लास्टिक भरतात.

फुफ्फुसांमध्ये आढळले १२ प्रकारचे प्लास्टिकचे तुकडे

सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात फुफ्फुसाच्या सर्व भागांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले. संशोधकांनी 12 प्रकारच्या प्लास्टिकचे नमुने तपासले, ज्यात पॉलीप्रोपीलीन आणि पॉलीथिलीन तसेच टेरेफ्थालेट यांचा समावेश आहे. हे प्लॅस्टिक सामान्यत: पॅकेजिंग, उत्पादनाच्या बाटल्या, कपडे, दोरी आणि सुतळीमध्ये आढळतात. मायक्रोप्लास्टिक्सच्या सर्वात धोकादायक स्त्रोतांमध्ये शहरातील धूळ, कापड आणि टायर यांचा समावेश होतो.

तज्ज्ञांच्या मते, अनेक खाद्यपदार्थ आणि पेयेही शरीरात मायक्रोप्लास्टिक्स भरत आहेत. यामध्ये बाटलीबंद पाणी, मीठ, सीफूड, टीबॅग, रेडी टू इट फूड आणि पॅकेज्ड फूड यांचा समावेश आहे. प्लॅस्टिकचे कण फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान करतात. ज्यामुळे कर्करोग, दम्याचा झटका आणि इतर आरोग्य समस्या उद्भवतात असे मानले जात आहे. पॉलिस्टर आणि नायलॉन तंतूंमधून निघणाऱ्या मायक्रोप्लास्टिक कणांमुळे कापड कामगारांमध्ये खोकला, दम लागणे आणि फुफ्फुसाची क्षमता कमी होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य