Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Plastic Plate Side Effects : जीवघेण्या कॅन्सरचं कारण ठरतंय प्लास्टिकच्या ताटात खाणं; प्लास्टिकचा आरोग्यावर कसा परिणाम होतोय वाचा

Plastic Plate Side Effects : जीवघेण्या कॅन्सरचं कारण ठरतंय प्लास्टिकच्या ताटात खाणं; प्लास्टिकचा आरोग्यावर कसा परिणाम होतोय वाचा

Disposal Plastic Plate Side Effects : आपल्यापैकी बरेचजण अन्न गरम करण्यासाठी प्लेटमध्ये ठेवतात आणि थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवतात. तुम्हीही असे करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:55 PM2021-10-26T13:55:37+5:302021-10-26T14:23:46+5:30

Disposal Plastic Plate Side Effects : आपल्यापैकी बरेचजण अन्न गरम करण्यासाठी प्लेटमध्ये ठेवतात आणि थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवतात. तुम्हीही असे करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.

Plastic Plate Side Effects : Disposal plate makes food poisonous may suffer from a disease like cancer | Plastic Plate Side Effects : जीवघेण्या कॅन्सरचं कारण ठरतंय प्लास्टिकच्या ताटात खाणं; प्लास्टिकचा आरोग्यावर कसा परिणाम होतोय वाचा

Plastic Plate Side Effects : जीवघेण्या कॅन्सरचं कारण ठरतंय प्लास्टिकच्या ताटात खाणं; प्लास्टिकचा आरोग्यावर कसा परिणाम होतोय वाचा

प्लास्टिकच्या भांड्यांचे सौंदर्य आपल्याला आकर्षित करते. अशास्थितीत आपल्यापैकी अनेकजण बाजारातून वेगवेगळ्या प्रकारची प्लास्टिकची भांडी विकत घेतात आणि रोज वापरायला लागतात. अनेकांना प्लास्टिकपासून बनवलेल्या प्लेट्स वापरायला खूप आवडतात. घासायला, स्वच्छ करायला सोपे असल्यानं अनेकजणी प्लास्टिकची भांडी वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की प्लास्टिकची प्लेट जितकी सुंदर दिसते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. (Plastic plates health risks)

संशोधनानुसार, प्लास्टिकच्या ताटात किंवा डिस्पोजेबल प्लेटमध्ये खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. वास्तविक, जेव्हा तुम्ही या प्लेट्समध्ये गरम अन्न किंवा इतर गरम वस्तू करायला ठेवता तेव्हा प्लास्टिकच्या प्लेटमध्ये असलेली रसायने तुमच्या अन्नात प्रवेश करू शकतात. हे पदार्थ तुमच्यासाठी विषारी ठरू शकतात.

प्लास्टीकच्या ताटांमुळे कॅन्सरचा धोका कसा?

आपल्यापैकी बरेचजण अन्न गरम करण्यासाठी प्लेटमध्ये ठेवतात आणि थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवतात. तुम्हीही असे करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. वास्तविक, जेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या प्लेटमध्ये अन्न ठेवता आणि ते थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवता तेव्हा त्यातील बरेच बारीक कण आणि थोडेसे प्लास्टिक तुमच्या अन्नात जाऊ शकते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही हे पदार्थ खातात, तेव्हा ही रसायने तुमच्या शरीरात पोहोचून तुमचे नुकसान करू शकतात.

BPA (किंवा Bisphenol A) चा वापर शुद्ध प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो. बीपीए हे प्रामुख्याने पॉली कार्बोनेट किंवा पीसी (रीसायकल कोड 7) नावाच्या प्लास्टिकच्या प्रकारात आढळते. हे शरीरासाठी मोठ्या प्रमाणात विषारी असू शकते. यामुळे, स्तन आणि प्रोस्टेट कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

बीपीए हे एक रसायन आहे जे तुमच्या शरीरातील इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सचे असंतुलन करू शकते. शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनच्या असंतुलनामुळे अनेक आजार होऊ शकतात. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे मूड बदलणे, प्रकाशाची संवेदनशीलता, तेलकट त्वचा, निद्रानाश, तणाव, चिडचिड, चिंता, कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात. विशेषत: यामुळे महिला वंध्यत्वाची तक्रार करू शकतात. बीपीएचे बनलेले कंटेनर गरम केल्याने अन्नातील बीपीएची पातळी वाढते.

Phthalates (प्लास्टिसायझर डायथिलहेक्सिल phthalate किंवा DEHP) प्रामुख्याने पॉलीव्हिनिल कार्बोनेट किंवा PVC (रीसायकल कोड 3) मध्ये आढळतात आणि हार्मोन्स आणि प्रजनन प्रणालीमध्ये समस्या निर्माण करतात असे आढळले आहे. सर्वसाधारणपणे, रीसायकल कोड 1, 2, 4 आणि 5 ने चिन्हांकित केलेल्या प्लास्टिकमध्ये BPA किंवा phthalates असण्याची शक्यता नसते.

लहान मुलांसाठीही धोक्याचे

प्लास्टिक पर्यावरणासाठी अजिबात चांगले नाही. जर तुम्ही लहान मुलांना प्लॅस्टिकच्या ताटात खाऊ घालत असाल तर त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. प्लॅस्टिकच्या ताटात सलग अनेक दिवस खाल्ल्याने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी जास्त काळ प्लास्टिकची भांडी वापरली तर त्यामुळे जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाबरोबरच तुमच्या आरोग्यालाही खूप हानी पोहोचवते. त्यामुळे प्लास्टिकची ताट आणि भांडी वापरू नका. जर तुम्ही प्लास्टिकची ताट किंवा इतर भांडी वापरत असाल तर त्यात अन्न गरम करण्याची चूक करू नका. तुमच्या या चुकीचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Web Title: Plastic Plate Side Effects : Disposal plate makes food poisonous may suffer from a disease like cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.