Join us

प्रदुषित हवेमुळेही होऊ शकतो मधुमेह? अभ्यास सांगतो- सतत खराब हवेत श्वास घेत असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2024 13:43 IST

Polluted Air Aay Also Be The Reason For Diabetes: मधुमेह होण्याचं आणखी एक कारण समोर आलं आहे. बघा याविषयीचा अभ्यास काय सांगतो...

ठळक मुद्दे अभ्यासकांच्या मते हवेमध्ये असणारे काही हानिकारक केमिकल्स श्वसनाद्वारे शरीरात जातात आणि पेंक्रियासाठी धोकादायक ठरतात.

भारतात मधुमेहाचे खूप रुग्ण आहेत. म्हणूनच तर भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता अशी मधुमेहाची कारणं मानली जातात. पण आता या जोडीला वायू प्रदुषण हे देखील मधुमेह होण्याचं एक कारण असू शकतं असं काही अभ्यासावरून म्हटलं जात आहे. (air pollution may increase the risk of diabetes)

 

भारतीय संशोधकांनी याविषयी नुकताच एक अभ्यास केला आहे. झी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार 'जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनॉलॉजी ॲण्ड मेटाबॉलिजम' मध्ये तो प्रकाशित झाला असून त्यामध्ये भारतातल्या १० शहरांमधील ५० हजार पेक्षाही अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे.

कोशिंबीर नेहमीच खातो, आता दाक्षिणात्य पद्धतीची 'कोसंबरी' खाऊन पाहा- घ्या खास रेसिपी 

त्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की जे लोक अधिकाधिक वेळ प्रदुषित हवेमध्ये असतात त्यांना डायबिटिज टाईप २ होण्याचा धोका इतर लोकांपेक्षा २५ टक्क्यांनी अधिक आहे.  

 

अभ्यासकांच्या मते हवेमध्ये असणारे काही हानिकारक केमिकल्स श्वसनाद्वारे शरीरात जातात आणि पेंक्रियासाठी धोकादायक ठरतात. शरीरात इन्सुलिनची निर्मिती करण्याचे काम पेंक्रिया करते. शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन असेल तरच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते.

फ्रिजच्या दाराचं रबर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, काळपट झालेलं रबर १ मिनिटांत होईल चकाचक

त्यामुळे धुळीमध्ये जाताना आता प्रत्येकाने अधिक सतर्क राहावे. शक्य झाल्यास प्रदुषित हवेत जाणे टाळावे. जायचेच असेल तर स्वत:च्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी. शक्य असेल तिथे एन- ९५ मास्क लावावे किंवा किमान रुमालाने नाक झाकून घ्यावे, असा सल्ला अभ्यासक देत आहेत. कारण भारतामध्ये प्रदुषित शहरांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहप्रदूषण