Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम

पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम

कोणतीही ट्रीटमेंट घेत असताना तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणे आणि प्रशिक्षित त्वचारोगतज्ज्ञाकडून उपचार घेणे आवश्यक आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 03:08 PM2021-11-07T15:08:37+5:302021-11-08T12:16:03+5:30

कोणतीही ट्रीटमेंट घेत असताना तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणे आणि प्रशिक्षित त्वचारोगतज्ज्ञाकडून उपचार घेणे आवश्यक आहे...

Porn star Mia Khalifa takes 'this' treatment to look young! Read the pros and cons of these measures | पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम

पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम

Highlightsचेहऱ्यावरील सुरकुत्या झाकण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटविषयी...कोणतेही उपचार घेण्यापूर्वी त्याची योग्य ती माहिती घेतलेली केव्हाही चांगली..

आपण कायम तरुण दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते, पण त्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. पॉर्नस्टारला तर सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी नेहमीच स्वत:ला अपडेट ठेवावे लागते. प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा आकर्षक दिसण्यासाठी सध्या बोटॉक्स ट्रीटमेंट घेत आहे. सतत येणारा घाम आणि सुरकुत्या यांपासून सुटका मिळवण्यासाठी तसेच तरुण दिसण्यासाठी अशाप्रकारची ट्रीटमेंट घेतली जाते. मिया खलिफा म्हणते मला काखेत खूप घाम येतो, त्यामुळे मी बोटॉक्स ट्रीटमेंट घेत आहे. पॉर्न इंडस्ट्री सोडलेली मिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव असते आणि आपले फोटो आणि व्हिडियो पोस्ट करत असते. तिचे टॉपलेस बोल्ड फोटो नेहमीच नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतात. असाच तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नुकताच तिने इंजेक्शन देतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्याला कॅप्शनही दिली आहे. यामध्ये ती म्हणते, आजचा दिवस मोस्ट लाइफचेंजिंग आहे. कारण मला काखेत खूप घाम येतो आणि गेल्या ५ वर्षांपासून मी हायपरहायड्रेसिस (Hyperhidrosis) या समस्येचा सामना करत आहे. यावर परफ्यूम किंवा डिओड्रंट वापरूनही फारसा उपयोग होत नव्हता. प्रमाणापेक्षा अधिक घाम येण्याच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी मी बोटॉक्स इंजेक्शन ट्रीटमेंट घेत आहे असं ती सांगते. आता मी जेव्हा वर्क आऊट करते किंवा टेक्सासच्या हिटमध्ये कुत्र्याला फिरवायला नेते तेव्हा एक थेंबही घाम येत नाही. तिच्यावर ट्रीटमेंट करणाऱ्या व्यक्तीचेही ती या पोस्टमध्ये आभार मानत आहे. पुढच्या टचअपपर्यंत मी वाट पाहू शकत नाही असे ती म्हणते. 

ज्यांना प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो, किंवा सुरकुत्या पडतात त्या घालवण्यासाठी ही ट्रीटमेंट घेतली जाते. यामुळे तुमची त्वचा तरुण दिसते. मात्र या ट्रीटमेंटमुळे तुमचा चेहरा किंवा शरीराचा इतर भाग टवटवीत न दिसतो एकप्रकारे खोट्या पद्धतीने त्याला तरुण केल्याचे समजते असे प्रसिद्धत्वचारोगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र पटवर्धन याबाबत सांगताना म्हणतात. डॉ. पटवर्धन म्हणतात, बोटॉक्स ही ट्रीटमेंट करण्यासाठी तज्ज्ञ त्वचारोगतज्ज्ञांची आवश्यकता असते. कोणत्याही डॉक्टरकडून ही ट्रीटमेंट घेणे योग्य नाही. यामध्ये दिले जाणारे इंजेक्शन किती प्रमाणात, कसे द्यायचे याचे योग्य ते ज्ञान असणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे शरीरावर तोटे होऊ शकतात. बोटॉक्स हे बॅक्टेरियापासून काढलेले एक टॉक्सिन असते. शरीराच्या विशिष्ट भागावरील स्नायू पॅरालाइज करण्याचे काम हे टॉक्सिन करते. अँटीएजिंग इफेक्टसाठी हे टॉक्सिन वापरले जाते. ही ट्रीटमेंट घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. अनेकदा डोळ्यांच्या खालील सुरकुत्या घालवण्यासाठी ही ट्रीटमेंट घेतली जाते. मात्र यातील औषधाचे प्रमाण जास्त झाले तर आयलीड पडून जाण्याची शक्यता असते असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. या ट्रीटमेंटला बऱ्यापैकी खर्च असून तीन ते ४ वेळा तुम्हाला फॉलोअपसाठी त्वचारोगतज्ज्ञांकडे जावे लागते. तसेच या ट्रीटमेंटमुळे चेहरा खरा न वाटता एकप्रकारचे मास्क लावला आहे असा खोटा दिसतो. 

Web Title: Porn star Mia Khalifa takes 'this' treatment to look young! Read the pros and cons of these measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.