Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात..

बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात..

Potato fries can cause cancer बटाटे नक्की कोणत्या पद्धतीने खावं, बटाटे तळून खाण्याचे दुष्परिणाम काय? पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 11:56 AM2023-03-26T11:56:03+5:302023-03-26T11:58:28+5:30

Potato fries can cause cancer बटाटे नक्की कोणत्या पद्धतीने खावं, बटाटे तळून खाण्याचे दुष्परिणाम काय? पाहा..

Potato fries can cause cancer | बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात..

बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात..

उपवासातला पदार्थ असो किंवा स्पेशल, प्रत्येक पदार्थात बटाटा फिट होतो. बटाटा हा प्रत्येक खाद्यपदार्थात टेम्परिंग एजंट म्हणून काम करतो. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. जे हायपोग्लायसेमिक इंडेक्स कमी करतात. बटाटा खाल्ल्याने पोट भरलेले वाटते. बहुतांश जण बटाटे फ्राईड करून खातात. जे आरोग्यासाठी चांगले नाही.

यासंदर्भात, आयुर्वेदिक डॉक्टर व गट हेल्थ कोच डॉ. डिंपल जंगडा सांगतात, ''तळलेले बटाटे खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो. कारण, जेव्हा तुम्ही बटाटे सोनेरी रंग येईपर्यंत तळता, तेव्हा त्यामध्ये कर्करोगकारक घटक तयार होतात. त्यामुळे बटाटे डीप फ्राय, फ्रेंच फ्राईज आणि बटाटा चिप्स या स्वरूपात खाणे टाळावे''(Potato fries can cause cancer).

ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय

डीप फ्राईड बटाटे खाण्याचे दुष्परिणाम

बटाटा तळून खाऊ नये

डॉ.डिंपल म्हणतात, ''बटाटा तळून झाल्यानंतर त्यात ऍक्रिलामाइड तयार होते. या घटकाला अनेक संशोधनांमध्ये कार्सिनोजेनिक म्हणतात. ज्यामुळे प्राणघातक कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते. यासह बटाटा तळल्यानंतर त्यातून पोषणही नष्ट होते.

नसांना करते नष्ट

 

डॉ.डिंपल यांच्या म्हणण्यानुसार, ''शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, ऍक्रिलामाइडमुळे शरीरातील मज्जातंतूंचे नुकसान होते. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि कॉर्डिनेशन संपते.''

पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी मीठ खाणेच बरे, असं डॉक्टर का सांगतात?

ऍक्रिलामाइड कसे तयार होते?

जेव्हा आपण पिष्टमय पदार्थ सोनेरी रंग येईपर्यंत तळतो, तेव्हा त्यात रासायनिक क्रिया तयार होते. यासह ऍक्रिलामाइड तयार होते. ही प्रक्रिया सामान्यतः तळलेले अन्न, बटाटा चिप्स आणि फ्रेंच फ्राईजमध्ये आढळून येते. हा घटक कुकीज, टोस्ट आणि कॉफीमध्ये देखील असतो.

उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय...

बटाटे खाण्याची योग्य पद्धत

कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटकाचे सेवन  करायचे नसेल तर, उकडलेले, भाजलेले किंवा वाफवलेले बटाटे खा. जर आपल्याला बटाटे तळून खायचे असेल, तर तळताना किंवा शिजवताना कमी तापमानावर शिजवा. तसेच बटाट्याचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत शिजवा.

शिजवण्यापूर्वी बटाटे भिजत ठेवा

डॉ. डिंपल सांगतात, ''तळण्यापूर्वी किंवा भाजण्यापूर्वी बटाट्याचे तुकडे ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे ऍक्रिलामाइडचे उत्पादन कमी होते, मगच त्याचा वापर करा.''

Web Title: Potato fries can cause cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.