गुडघे दुखणं चालताना गुडघ्यांमध्ये वेदना होणं या खूप कॉमन समस्या आहेत. साधारण वयाच्या पन्नाशी नंतर गुडघेदुखीचा त्रास सुरु होतो. परंतु बदलत्या काळानुसार अलीकडे कमी वयातच किंवा तरुणपणीच गुडघेदुखीच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. कमी वयातच गुडघेदुखी आणि गुडघ्यांच्या इतर समस्या निर्माण होण्यासाठी खरंतर अनेक कारणं आहेत. चुकीचा आहार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, बैठी लाइफस्टाइल, लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे कमी वयातच गुडघेदुखी होऊ शकते. गुडघेदुखीचा परिणाम आपल्या रोजच्या रुटीनवर होतो. काहीवेळा या गुडघेदुखीमुळे (Potli massage for knee pain) चालणं - फिरणं देखील खूप मुश्किल होते. गुडघेदुखीच्या या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर खूप मोठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते(Ajwain Garlic Ginger & Mustard Oil For Joint Pain).
गुडघेदुखी कमी करण्यासाठी काहीजण वेगवेगळ्या प्रकारच्या पेनकिलर घेतात. यासोबत काही क्रिम्स, मलम, दुखणं कमी करणारे स्प्रे असे अनेक उपाय करुन पाहिले जातात. या उपायांमुळे काही काळासाठी आराम मिळत असला तरीही हा गुडघेदुखीचा त्रास कमी होत नाही. अशावेळी आपण गुडघेदुखी कमी करण्यासाठी आयुर्वेदातील पोटली मसाज करु शकता. पोटली मसाज केल्याने आपला गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. या पोटलीमध्ये असणाऱ्या काही आयुर्वेदिक (Ayurveda Potli Massage for Knee Pain) घटकांमुळे तुम्हाला गुडघेदुखी पासून आराम मिळू शकतो. गुडघेदुखीवर हा पोटली मसाज नेमका कसा करावा ते पाहूयात(Ayurvedic Herb Healing Potli - Quick Pain Relief Massage For Knee).
पोटली मसाज करण्यासाठी आवश्यक साहित्य :-
१. ओवा - १ टेबलस्पून २. लसूण - १० ते १२ पाकळ्या (बारीक किसलेल्या) ३. आलं - १ टेबलस्पून (बारीक किसलेल) ४. मोहरी तेल - १ कप
जंक फूड-स्ट्रेस-हेअर कलर; केस गळण्याची ३ मुख्य कारणं- टक्कलही पडू शकतं कारण...
कृती :-
१. एक कढई घेऊन त्यात ओवा, लसूण, आलं ५ मिनिटे कोरडे भाजून घ्यावे. २. आता दुसऱ्या भांड्यात मोहरीचे तेल हलकेच कोमट गरम करुन घ्यावे. ३. कढईत कोरडे भाजून घेतलेले सगळे जिन्नस एका कॉटन किंवा मलमलच्या कापडात बांधून त्याची पोटली तयार करावी. ४. आता ही पोटली कोमट गरम असलेल्या मोहरीच्या तेलात बुडवून घ्यावी. ५. मोहरीच्या तेलात बुडवून घेतलेली पोटली गुडघ्यांवर ठेवून मसाज करुन घ्यावा.
सकाळी उठल्याउठल्या पांघरुणावर बसूनच करा ५ स्ट्रेचिंग- दिवसभर कितीही काम करा-एनर्जी जबरदस्त....
गुडघेदुखीवर पोटली मसाज करण्याचे फायदे...
१. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी ॲसिड, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे सांध्यातील जडपणा आणि सूज कमी होते. २. लसणामध्ये ॲलिसिनसारखे अँटी-ऑक्सिडेंट आणि सल्फर असते. हे वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ३. गुडघ्यांमध्ये रक्त प्रवाह सुधारून सांधेदुखीपासून आराम मिळतो . ४. ओव्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे सांधेदुखी आणि कडकपणा दूर करते. ५. ओवा, लसूण आणि मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. ६. आले सूज कमी करते आणि गुडघ्यातील रक्त प्रवाह सुधारते.