प्रेमानंद महाराज आपले उपदेश आणि अध्यात्मिक सल्ले यासाठी सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण बदलांबाबत उपाय सुचवले आहेत. असाच एक व्हिडिओ प्रेमानंद महाराजांनी शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये ज्या लोकांना सकाळी उठायला त्रास होतो त्यांनी काय करायला हवं कोणत्यावेळी सकाळी उकाळी उठावे याबाबत सांगितले आहे. (Premanand Maharaj Tips on How To Wake Up Early In The Morning)
सकाळी उठायला बऱ्याचजणांना खूपच आळस येतो. सकाळी वेळेवर जाग येत नाही त्यामुळे दिवसभरातील कामही उशीरा होतात. यामुळे पूर्ण दिनचर्या बिघडू शकते. प्रेमानंद जी महाराजांनी सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. प्रेमानंद महाराज सांगतात की सकाळी उठायला तुम्हाला त्रास होत असेल तर याचा अर्थ असा नाही करी तुम्ही पुरेसे मोटिव्हेटेडेट नाही.
प्रेमानंद महाराज यांच्यानुसार तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल तर झोपण्याच्याआधी चिंतन करताना आपल्या उठण्याच्या वेळेबद्दल विचार करा. जसं की सकाळी ४ वाजता उठायचं असेल तर मेंदूला तसेच सांगून ठेवा. सकाळी ४ वाजता उठून ध्यान आणि चिंतन करा. सकाळी तुमची झोप आपोआप उडेल.
याव्यतिरिक्त प्रेमानंद महाराज सांगतात की सकाळी ४ वाजता उठणं सकाळी उठण्याची सगळ्यात योग्यवेळ आहे. त्यानंतर अंघोळ करा त्यानंतर व्यायाम आणि प्रमाणायाम करा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न करायला हवा.
प्रेमानंद महाराज सांगतात की सकाळी ११ वाजताच्या आधी आहार ग्रहण करावा. सकाळी उशीरा उठणं वेळ खराब करते. यासाठी शरीराला आजकालच्या जनरेशनमध्ये अनेक समस्या उद्भवतात. त्वचेवर सुरकुत्या आणि कोरडेपणा येऊ लागतो.
महाराजांनी सल्ला दिला आहे की रोज व्यायाम करून तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. फक्त २० मिनिटं का होईना नेहमी व्यायाम करा. २० मिनिटांचा व्यायाम तुमच्या जीवनात वरदानाप्रमाणे काम करेल आणि तुम्हाला चांगले फिल होईल आणि तुम्ही अधिकच सुंदर दिसाल.