Join us   

डायबिटीस असलेल्यांनी अवश्य खा ४ प्रोटीनयुक्त पदार्थ, शुगर नियंत्रणात ठेवायची तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 11:29 AM

Protein Rich Food For Diabetics : आहाराची भूमिका महत्त्वाची असून आरोग्य उत्तम ठेवायचे तर आहारात प्रोटीन, कर्बोदके, जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात असायला हवीत.

ठळक मुद्दे शुगर नियंत्रणात ठेवायची तर आहारात असायलाच हवेत ४ पदार्थ आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात असेल तर डायबिटीस नियंत्रणात राहण्यास होते मदत

डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. जीवनशैलीशी निगडीत असलेली ही समस्या वेळीच नियंत्रणात ठेवायला हवी, अन्यथा आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते. डायबिटीस हा हळूहळू शरीराला पोखरणारा आजार असून त्यावर वेळीच योग्य ते उपाय न केल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. डायबिटीस नियंत्रणात ठेवायचा तर आहार, व्यायाम, औषधोपचार आणि ताणतणाव या गोष्टींवर प्रामुख्याने नियंत्रण ठेवायला हवे. यातही आहाराची भूमिका महत्त्वाची असून आरोग्य उत्तम ठेवायचे तर आहारात प्रोटीन, कर्बोदके, जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात असायला हवीत (Protein Rich Food For Diabetics).

(Image : Google)

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशनच्या अहवालानुसार आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात घेतले तर रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश अवश्य असायला हवा. डायबिटीसमुळे रुग्णाच्या किडनीवर परिणाम होतो आणि भविष्यात किडनीच्या कार्यात अडथळा येऊन रुग्णाना डायलिसिस करावे लागते. मात्र शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. व्यक्तीला त्याच्या वजनाच्या १० टक्के प्रोटीन्सची आवश्यकता असते. आता यासाठी आहारात कोणत्या 4 पदार्थांचा समावेश करायला हवा ते पाहूया.

१. डाळी 

डाळींमध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे दिवसभरातील आहारात विविध प्रकारच्या डाळींचा योग्य प्रमाणात समावेश असेल तर प्रोटीन वाढण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. 

२. सुकामेवा 

आपण साधारणपणे थंडीच्या दिवसांत सुकामेवा खातो. पण एरवीही ठराविक प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सुकामेवा खाल्ल्यास शरीराची प्रोटीन्सची गरज भरुन निघण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. अंडी 

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्याने डायबिटीस असलेल्यांनी आहारात प्रोटीन्सचा अवश्य समावेश करायला हवा. 

४. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ 

दूधामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी आपल्या आहारात दूध, दही, ताक, पनीर, चीज यांसारख्या गोष्टी भरपूर प्रमाणात घ्यायला हव्यात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहआहार योजना