किचनमधला पसारा कितीही आवरला तरीही संपता संपत नाही. त्यातल्या त्यात भांडी घासालयला किचनचा ओटा स्वच्छ करायला खूप जास्त वेळ लागतो. (Kitchen Tips) ही २ कामं झाल्याशिवाय किचन स्वच्छ झाल्यासारखं वाटतंच नाही. रोजच्या नाश्त्याची, जेवणाची भांडी घासणं म्हणजे खूप बोअरिंग काम. (Easy Home Cleaning Tips) एखादेवेळी पदार्थ करपला असेल तर जळलेली भांडी कमी वेळात कशी स्वच्छ करायची याचं फार टेंशन असतं. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून रोजची भांडी लवकर स्वच्छ व्हावीत यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. (Quick easy cleaning hacks for home)
जळलेली भांडी झटपट साफ कशी करायची? (How to clean burnt utensils at home)
सहसा, आपण जळलेल्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवतो आणि लगेच साबणाने धुण्यास सुरुवात करतो. पुष्कळ वेळा टोकदार वस्तूचा वापर करून त्यावर जमा झालेला काळपटपणा काढतात. पण डिशवॉशर किंवा कोणत्याही साबणाने घासूनही जळलेली भांडी साफ होत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. जाणून घ्या काही सोप्या पद्धती, ज्याच्या मदतीने जळालेली भांडीही नव्यासारखी चमकतील.
फक्त २ मिनिटात किचन, बाथरूममधील ड्रेनेजचा दुर्धंग होईल दूर; ७ टिप्स, घर नेहमी राहील फ्रेश, स्वच्छ
१) बेकिंग सोडा
जळलेली भांडी बेकिंग सोड्याने सहज साफ करता येतात. यासाठी एका जळलेल्या भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात १/४ कप बेकिंग सोडा टाकून उकळवा. 15 मिनिटे गॅसवर ठेवा. नंतर पाणी थंड झाल्यावर नेहमीप्रमाणे धुवा
२) टोमॅटो
टोमॅटोचा रस जळलेली भांडी साफ करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. टोमॅटोचा रस आणि पाणी जळलेल्या भांड्यात घाला आणि गरम करा. हे पाणी थंड झाल्यानंतर भांड स्वच्छ घासून घ्या.
३) मीठ
जळालेल्या भांड्यात मीठ आणि पाणी घाला आणि 4 मिनिटे उकळवा. नंतर डिशवॉशिंग वायर किंवा ब्रशने डाग साफ करा.
४) व्हिनेगर
जर भांडी खूप जळली असतील आणि बेकिंग सोड्यानंही ते साफ होत नसेल तर एकदा व्हिनेगर वापरून पहा. यासाठी 1/4 कप व्हिनेगर भांड्यात उकळवा आणि नंतर 2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि सामान्य पद्धतीने स्वच्छ करा. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र उकळू नका कारण ते भांडे खराब करू शकतात.
५) डिर्टेंजंट
भांड्यावर जळलेल्या दुधाचे काही कण असल्यास त्यात एक चमचा डिटर्जंट पावडर टाकून उकळत्या पाण्यात घाला. पाण्याला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून भांडे दोन ते तीन तास किंवा रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी चमच्याने डाग काढून टाका आणि भांडं स्वच्छ धुवा.
६) कांदा
जळालेली भांडी पाहिल्यानंतर टेंशन घेण्याची गरज नाही. अशा स्थितीत, जेव्हाही तुमची भांडी जळते तेव्हा तुम्हाला फक्त एक कांदा लागेल. कांद्याचे छोटे तुकडे करा आणि एका भांड्यात पाणी टाकून गरम करा. काही वेळातच भांड्याच्या जळण्याच्या खुणा वरच्या दिशेने तरंगू लागतात. त्यानंतर वॉशिंग पावडर किंवा साबणाने भांडी स्वच्छ करा. जळलेले डाग अगदी सहज निघून जातील. तसेच भांड्यात कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही.