आजकाल अनहेल्दी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. वेळीच उपाय केला नाही तर गंभीर समस्या उद्भवतात. यापासून सुटका करण्यासाठी लोक औषधांचा आधार घेतात. पोट साफ होण्यासाठी सतत गोळ्या औषधं खाणं हे सुद्धा चुकीचं आहे. (Home Remedies For Constipation)यामुळे किडनीवर आणि पोटाच्या आरोग्यावरही चुकीचा परीणाम होतो. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी दही, ताकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. दह्याबरोबर काही भाज्यांचा आहारात समावेश केला तर गॅस होणं, पोट साफ न होणं, अपचन या समस्या टाळता येतील. (Quick Home Remedies For Constipation Relief)
दही आणि काकडी
गॅस, ब्लोटींग टाळण्यासाठी दही काकडी हा उत्तम पर्याय आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोबायटिक्स असतात. ज्यामुळे मल आतड्यात जमा होत नाही. नियमित सकाळी दही आणि काकडी खाल्ल्यानं पोटाचे त्रास दूर होतात.
पालक आणि दही
दही आणि पालक दोन्ही तब्येतीसाठी उत्तम ठरतात. जर तुम्ही या दोन्हींची कॉम्बिनेशन खाल्ले तर गॅस, एसिडीटीच्या समस्येपासून आराम मिळेल. एका वाटीत दही घेऊन त्यात चिरलेली पालक घाला आणि नंतर त्यावर झाकण ठेवा. १ तासानं याचे सेवन करा. दही आणि पालक एकत्र खाल्ल्यानं पोटाच्या समस्यांपासून आराम मिळेल.
कांदा आणि दही
गॅसचा त्रास टाळण्यासाठी दही आणि कांद्याचं कॉम्बिनेशन फायदेशीर ठरतं. जास्तीत जास्त लोक रायता बनवून खातात. कांदा आणि दही एकत्र खाल्यानं पोटाचे त्रास दूर होतात. एक वाटी दह्यात एक मध्यम आकाराचा कांदा घालून याते सेवन करा.
केळी
गॅसपासून आराम मिळवण्यासाठी केळीसुद्धा उत्तम पर्याय आहे. केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड असतात जे तुम्हाला अॅसिड रिफ्लक्स टाळण्यात मदत करतात. गॅसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही रोज एक केळी खाऊ शकता
तुळशीची पानं
तुळशीच्या पानांमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो. यासाठी तुळशीची तीन ते चार पाने घेऊन खावी लागतील. याशिवाय, तुम्ही ते गरम पाण्यात टाकूनही सेवन करू शकता.