Join us   

कळत - नकळत दररोज साखरेचं सेवन करता? १४ दिवस साखर सोडून पाहा, किती बदल होतो तब्येतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2023 7:04 PM

Quit Sugar For 14 Days To See These Changes In Your Body पांढरी साखर शरीरासाठी घातक, पाहा शरीरात होणारे दुष्परिणाम

वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व आलंय? रात्रीची झोप उडाली आहे? जर तुम्ही या समस्येमधून जात असाल तर, याचं कारण कदाचित साखर असू शकतं. साखररेचं सेवन आपण अनेक पदार्थांमधून करतो. गोड पदार्थ बनवायचं असेल तर, साखरेचा उपयोग होतोच. पण जर तुम्ही १४ दिवसांसाठी साखरेचं सेवन बंद केलं तर? याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होतो.

साखर हे एक हाय कॅलरी फूड आहे. १ ग्राम साखरेमध्ये ४ टक्के कॅलरी असते. ज्याचं रुपांतर झपाट्याने फॅटमध्ये होते. अशा परिस्थितीत लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हायपरलिपिडेमिया, हृदय आणि मेंदूशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने १०,००० साखरप्रेमींचे १५ वर्षांसाठी सर्वेक्षण केले, यात असे आढळून आले की, सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत साखर प्रेमींमध्ये हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका ३ पट जास्त आहे. त्यामुळे साखरेयुक्त पदार्थ आपल्यासाठी घातक आहे.''

यासंदर्भात फोर्टिस रुग्णालयातील आहारतज्ज्ञ सिमरन सैनी म्हणतात, ''जर आपण १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केलं, तर शरीरात आरोग्यदायी बदल दिसून येतील. चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या कमी होतात, वजन कमी होते, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते, अधिक उत्साही आणि सक्रिय वाटते. यासह मूत्रपिंडाचे कार्य आणि चयापचय क्रिया उत्तमरित्या काम करते''(Quit Sugar For 14 Days To See These Changes In Your Body).

त्वचेवर आश्चर्यकारक बदल

१४ दिवसांसाठी साखर बंद केल्यानंतर, त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येते. ग्लायकेशन हे त्वचेच्या वृद्धत्वाचे मुख्य कारण आहे. हे कमी झाले की, चेहऱ्यावर वृद्धत्व लवकर दिसून येत नाही. साखर कमी केल्याने त्वचा अधिक मजबूत, अधिक लवचिक होते.

रक्तवाहिन्यांचे काम उत्तम चालावे म्हणून खा ५ सुपर फुड्स, रक्ताभिसरण होईल चांगले आणि शरीर धडधाकट

मधुमेहाचा धोका कमी होतो

मधुमेहग्रस्त रुग्णांना साखरयुक्त पदार्थ खाण्यास टाळायला सांगतात. जास्त साखरेचे सेवन यकृताभोवती फॅटी डिपॉझिट बनवते, जे कालांतराने स्वादुपिंडाच्या कार्यावर परिणाम करते. मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता साखरेचे सेवन कमी करणं अत्यंत गरजेचं आहे.

वजन होते कमी

साखरेत कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन वाढते. साखर सोडल्याने अतिरिक्त पाउंड कमी होण्यास मदत होते. जास्त वजनामुळे येणाऱ्या आरोग्य समस्या टाळता येतात.

कोरफडीच्या गरात ५ गोष्टी मिक्स करा आणि पाहा चेहऱ्यावर नितळ जादू ! पिंपल्सचा त्रास कमी..

हृदयाच्या संबंधित समस्या कमी होते

साखर कमी केल्याने हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

शांत झोप लागते

साखर कमी केल्याने शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने निद्रानाशास सामोरे जावे लागते. त्यामुळे साखरेचं सेवन कमी करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमधुमेहवेट लॉस टिप्स