Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी उठताना पोटऱ्यांमध्ये गोळे येतात,पाय जड होतात; डॉक्टर सांगतात याची कारणं-उपाय

सकाळी उठताना पोटऱ्यांमध्ये गोळे येतात,पाय जड होतात; डॉक्टर सांगतात याची कारणं-उपाय

Reasons and remedies for pain in calf muscles : आयुर्वेद, योग आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास या समस्येवर मात करता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 09:44 AM2024-10-04T09:44:02+5:302024-10-04T09:45:01+5:30

Reasons and remedies for pain in calf muscles : आयुर्वेद, योग आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास या समस्येवर मात करता येते

Reasons and remedies for pain in calf muscles : When waking up in the morning, there are lumps in the , legs feel heavy; Doctors tell the reasons-remedies for this | सकाळी उठताना पोटऱ्यांमध्ये गोळे येतात,पाय जड होतात; डॉक्टर सांगतात याची कारणं-उपाय

सकाळी उठताना पोटऱ्यांमध्ये गोळे येतात,पाय जड होतात; डॉक्टर सांगतात याची कारणं-उपाय

डॉ. पौर्णिमा काळे

आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ 

पोटऱ्या किंवा पिंडऱ्या म्हणजेच इंग्रजीत ज्याला आपण काफ मसल्स म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत "दुसरे हृदय" म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे शरीरातील रक्त हृदयाकडे परत पोहोचवण्यासाठी या पोटऱ्या महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः पायांकडून रक्त हृदयाकडे पोचवण्याच्या कामात या पोटऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. बहुतांश स्त्रियांना सकाळी झोपेतून उठल्यावर पोटऱ्या जड झाल्यासारखे वाटते. काहींना गोळे येऊन पोटऱ्या दुखतात. रोजच्या घाईगडबडीत आपण याकडे दुर्लक्ष करतो. पोटऱ्या मध्ये पेटके येणे एक सामान्य समस्या आहे, परंतु योग्य निदान आणि उपायांनी यावर नियंत्रण मिळवता येते. आयुर्वेद, योग आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास या समस्येवर मात करता येते. पाहूया पेटके येण्यामागची कारणे आणि त्यावरील उपाय (Reasons and remedies for pain in calf muscles)...

नेमकं होतं काय?

१. अचानक तीव्र वेदना: पोटऱ्यांमध्ये अचानक तीव्र वेदना जाणवते.

२. स्नायूं आकुंचन: पोटऱ्यामधील स्नायू अचानक आकुंचन पावतात त्यामुळे पाय मागच्या बाजुने कडक होतात. 

३. स्नायूमध्ये थरथर: काही वेळा पोटऱ्यांमध्ये थरथर जाणवते.

(Image : Google)
(Image : Google)

४. हालचालींमध्ये अडथळा: चालणे, उभे राहणे किंवा पाय वाकवणे कठीण होते.

५. दिवसभर थकवा: पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये थकवा जाणवतो आणि दिवसभर अस्वस्थता राहू शकते.

पोटऱ्या जड किंवा कडक होण्यामागची कारणे

१. पाण्याची कमी:

शरीरात पाण्याची कमी असल्यास, स्नायूंमध्ये  क्रँप येतात.

२. इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन:

सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचा अभाव.

३. अतिव्यायाम:

अत्यधिक व्यायाम किंवा अचानक श्रम करणे, विशेषतः नवा व्यायाम कार्यक्रम सुरू केल्यास क्रँप्स येऊ शकतात.

४. स्नायूंवर ताण:

अति चालणे, उभे राहणे किंवा बसणे यामुळे स्नायू ताणले जातात.

५. आहारातील कमतरता:

जीवनसत्त्वे विशेषतः व्हिटॅमिन D आणि B12 ची कमतरता.

६.गर्भधारणेदरम्यान आणि वृद्ध व्यक्तींनाही पोटऱ्यांमध्ये म्हणजेच पायांत पेटके येण्याचा त्रास होतो 

७. व्हेरीकोज वेन्ससारख्या समस्येमुळेही पोटऱ्या दुखतात.

उपाय काय?

१. तीळ तेलाचा मसाज -

तीळाच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि पेटके येण्याचे प्रमाण कमी होते.

२. स्वेदन (शेक )-

गरम पाण्यात पाय बुडवून ठेवणे. गरम पाण्यामुळे स्नायूंना आलेला ताण कमी होतो.

(Image : Google)
(Image : Google)

३. योग आणि व्यायाम -

 अ) पोटरीच्या स्नायूंचा स्ट्रेच:

पाय थोडे पुढे ठेवून पायाच्या अंगठ्यांना हलके ओढा. यामुळे पोटरीच्या स्नायूंना स्ट्रेच मिळेल आणि ते दुखायचे कमी होईल. 

ब) लेग रेज - दोन्ही पाय भिंतीला लावून 90 अंशात वर करून ठेवावेत.

क) योग शास्त्रातील विपरीत करणी, उत्तानासान, पवनमुक्तसन , वज्रासन इत्यादी आसनांचा पायाचे रक्ताभिसरण सुधारण्यास उपयोग होतो. तसेच यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात.

ड) दोन्ही टाचांवर उभे राहून वर खाली करावे.  त्याने पोटऱ्यांचा रक्त पुरवठा चांगला होतो.

४. अॅनिमिया (रक्तक्षय)

यामध्ये स्नायूंना रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे थकवा जाणवतो, वेदना जाणवतात. त्यामुळे रक्त वाढवणारा आहार विशेषतः डाळिंब, खजूर, काळ्या मनुका यांचे सेवन करावे.

५. जीवनशैलीतील बदल

शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी आणि द्रव पदार्थ घ्यायला हवेत. 

६.संतुलित आहार

जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांनी समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे.

७. प्राणायाम 

यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळतो व पेटके येण्याचे प्रमाण कमी होते.

Web Title: Reasons and remedies for pain in calf muscles : When waking up in the morning, there are lumps in the , legs feel heavy; Doctors tell the reasons-remedies for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.