सध्याचा काळ असा आहे की स्ट्रॉबेरीचा हंगाम संपत आला आहे आणि द्राक्षांचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे ही दोन्ही फळं आपण उत्साहाने घेतो आणि खातो. पण ही फळं खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना कानात खाजवल्यासारखं होतं किंवा मग घसा तडतडल्यासारखा होतो किंवा खवखवतो. घशात टोचल्यासारखं होतं आणि कफ, सर्दी असाही त्रास होतो (Throat Pain After Eating Grapes And Strawberry). ही दोन फळं खाल्ल्यानंतरच असं का होतं, याविषयी डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. तसेच असा त्रास होऊ नये, म्हणून काय उपाय करावा, याविषयीही सांगितलं आहे. (Reasons and remedies for throat pain after eating grapes and strawberry)
द्राक्षं, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने घसा का खवखवतो?
द्राक्षं किंवा स्ट्रॉबेरी खाल्ल्याने घसा का खवखवतो, याविषयीचा एक व्हिडिओ डॉक्टरांनी drasrani_india या इनस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की द्राक्षं आणि स्ट्रॉबेरी या फळांवर खूप जास्त खतं, किटकनाशक फवारणी केली जाते.
नॉनस्टिक तव्याचे कोपरे खूप चिकट- तेलकट झाले? १ सोपा उपाय- न घासता तवा होईल चकाचक
ही फवारणी एवढ्या जास्त प्रमाणात असते की त्यामुळे त्या फळांच्या बाह्य भागांवर त्या खतांचं, किटकनाशकांचं एकप्रकारे कोटिंग किंवा आवरण तयार होतं. अशी फळं खाल्ल्याने घशाला त्रास होतो. बऱ्याचदा यामुळे बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनही होतं.
द्राक्षं, स्ट्रॉबेरी खाल्ल्यावर घसा दुखू नये म्हणून उपाय
त्या फळांचा हंगाम जेव्हा भरात असेल तेव्हाच ही फळं खाणं सगळ्यात उत्तम. कारण तेव्हा हवामान अनुकूल असल्याने या फळांवर जास्त खत किंवा किटकनाशक फवारणी करावी लागत नाही.
जेनिफर विंगेट सांगते- बस्सं... मुझसे इतनाही हो पायेगा, असं म्हणायला शिकलं पाहिजे, कारण...
दुसरा उपाय म्हणजे ही फळं खाण्याआधी २० मिनिटे पाण्यात भिजून ठेवा. त्यानंतर त्या पाण्यातून काढून ती नळाच्या वाहत्या पाण्याखाली धरून अर्धा मिनिट स्वच्छ करा. त्यानंतर ती कोरड्या कपड्या पुसून पुर्णपणे कोरडी करून घ्या आणि त्यानंतरच ती खा. असे केल्याने ती फळं पुर्णपणे स्वच्छ होतील.