सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणाच्या आधी भूक लागणं, दुपारच्या जेवणानंतर 3-4 तासांनी भूक लागणं ही सामान्य बाब आहे. पण सकाळी पोटभर नाश्ता केल्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते. काही खाल्ल्यानं ही भूक शमते असं नाही तर दिवसभर अशी भूक सारखी लागते. भूक लागली म्हणून खाल्लं जातं. हे असं खाणं वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतं. सारखी भूक (feeling hungry always) लागण्याकडे दुर्लक्ष करणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक असतं. व्यायाम जास्त केला तर जास्त भूक लागणं स्वाभाविक असतं, गरोदरपणात भूक वाढणं सामान्य आहे, आजारपणातून बरं होतानाही भूक वाढते. पण याशिवाय सतत भूक लागण्यामागे (reasons behind excessive hunger) छोट्या मोठ्या आरोग्यविषयक समस्याही असतात. त्यामुळे लागत असेल भूक असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच सावध होणं आरोग्यास फायदेशीर ठरेल.
Image: Google
सतत भूक का लागते?
1. मानसिक ताण तणाव असल्यास, चिंता असल्यास भूक जास्त लागते. कारण यात मेंदूवर ताण येतो. त्याटुन काॅर्टिकोट्रोपिन रिलीज हार्मोन आणि ॲड्रेनलाइन हे हार्मोन हे जास्त स्त्रवतं. या हार्मोनमुळे भूक वाढते. तणाव चिंता दीघकाळ टिकून राहिल्यास ॲड्रेनल ग्रंथीतून काॅर्टिसाॅल हे हार्मोन जास्त स्त्रवतं. या हार्मोनमुळेही भूक वाढते. यासोबतच बायपोलर डिसाॅर्डर , औदासिन्य या मानसिक आजारांमुळेही सतत भूक लागते
2. बुलिमिया नामक खाण्याचा विकार असल्यास सतत भूक लागते. या विकारात नियंत्रणाबाहेर खाल्लं जातं.तर खाण्याशी संबंधित आणखी एक विकार जो लहानपणापासूनच जडलेला असण्याची शक्यता असते. यात उदास वाटलं की जास्त खाल्लं जातं.
3. पोटात जंत झाले असल्यास खाल्ल्यानंतरही पुन्हा भूक लागते. पोटातील जंत सेवन केलेल्या अन्नातून पोषण शोषून घेऊन शरीरात केवळ त्यातील फॅट्स आणि साखरच शिल्लक राहाते.
4. हायपोग्लायसीमिया या रक्तातील साखरेशी निगडित काणामुळे सतत भूक लागते. हायपोग्लायसीमियामुळे सतत भूक लागणं, थकवा येणं, डोकं दुखणं, शरीर थंड पडणं, गोंधळ उडणं, चक्कर येणं ही लक्षणं जाणवतात. क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं, आहारात पुरेशा कर्बोदकांचा समावेश नसणं, उपाशी राहाणं या कारणांमुळे हायपोग्लायसीमिया होतो. हायपोग्लासीमियाचा त्रास काही वेळापुरती उद्भवतो आणि काही खाल्ल्यानंतर रक्तातील साखर नियंत्रित होते. पण जर आधीपासूनच यकृताशी संबंधित आजार असल्यास हायपोग्लासीमिया हा आजार गंभीर रुप धारण करतो. त्यामुळे सारखी भूक लागते.
Image: Google
5. टाइप 2 डायबिटीज असल्यास सारखी भूक लागते. शरीराला गरज नसतानाही खाल्लं जातं. शरीरातील पेशी साखरेसाठी इन्सुलिनवर अवलंबून असतात. पण पुरेशा प्रमाणात इंसुलिन तयार होत नसल्यास किंवा योग्य प्रकारे काम करत नसल्यास पेशींना साखर मिळत नाही तर ती रक्तात मिसळली जाते. पेशींची गरज मात्र भागत नाही. त्यामुळे मेंदूकडे पेशी भूक लागण्याचा संदेश पाठवतात.
6. आजारांवरची विशिष्टं औषधंही सतत भूक लागण्यास कारणीभूत ठरतात. कोर्टिकोस्टेराॅइडस , साइप्रोफेटेडाइन आणि ट्राइसाइक्लिक ॲण्टिडिप्रेसण्ट औषधं सेवन करत असल्यास सतत भूक लागते.
7. पीएमएस म्हणजेच प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचं एक लक्षणं म्हणजे सतत भूक लागणं. पाळीपूर्वी एक ते दोन दिवस जास्त भूक लागणं, पोटात कळा येणं, डोकं दुखणं, बह्दकोष्ठता होणं या समस्या जांणवतात.
Image: Google
8. हायपरथायराॅडिज्म या थायराॅइडशी निगडित समस्येत सतत भूक लागण्याची समस्या निर्माण होते. थायराॅइड ग्रंथी चयापचय क्रियेचा वेग वाढवते. थायराॅइडशी निगडित समस्या निर्माण झाल्यास त्यातही हायपरथायराॅडिज्मचा त्रास होत असल्यास भूक वाढते.
9. प्रेडर विली सिंड्रोम या आनुवांशिक समस्येत जास्त भूक लागते. या त्रासात भूक वाढण्यसोबतच वजनही वाढतं. हा आजार प्रामुख्यानं आनुवांशिक असतो.
10. क्रोमोजोमल ॲब्नाॅर्मेलिटी या आनुवांशिक आजारातही भूक जास्त आणि सतत लागते. आपल्या शरीराला प्राप्त होणारी ऊर्जा आणि शरीराकडून खर्च होणारी ऊर्जा यात असमतोल निर्माण झाल्यास वजन वाढतं. मेंदूत हायपोथॅलेमस नावाचा एक भाग असतो. हा भाग प्रात्प ऊर्जा आणि खर्च होणारी ऊर्जा यावर नियंत्रण ठेवतो. पण यात जर काही समस्या निर्माण झाली तर मात्र हे नियंत्रण सुटतं आणि भूक वाढते.