बरेच लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत वेळीच वजनावर नियंत्रण मिळवणं फार महत्वाचे आहे. हेल्दी डाएटच्या मदतीनं तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. एक निरोगी आणि चांगले अन्न वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. (Khichdi Benefits For Weight Loss) खिचडी एक कंफर्ट फूड आहे. खिचडी वजन कमी करण्यासही मदत करते. न्युट्रिशनिस्ट आणि डायटेटिक्स डॉ. अदिती शर्मा यांनी खिचडी खाल्ल्यानं शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Why Khichdi Is a Weight Loss Friendly Food)
खिचडी एक स्वादीष्ट आणि पौष्टीक वन पॉट मील आहे. अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये खिचडी खाल्ली जात आहे. खिचडी हे तांदूळ, डाळ आणि सुगंधित मिश्रण आहे. यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या, जडी-बूटी किंवा प्रोटीनचे स्त्रोत एड करू शकता.
वजन कमी करण्यासाठी खिचडी खाण्याचे फायदे
डायटिशियन आदिती शर्मा यांच्यामते खिचडी खाल्ल्यानं शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित होते. खिचडी खाऊन तुम्ही दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला ओव्हरइटींग होणार नाही आणि कॅलरीज इंटेकही कमी राहील. ज्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळेल आणि वर्कआऊटदरम्यान लवकर थकवा येणार नाही. शरीर जास्तीत जास्त फॅट बर्न करेल.
फायबर्सची उच्च गुणवत्ता
खिचडीत उच्च प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. भूक नियंत्रित राहते, फॅट लॉस होण्यास मदत होते. रोज गरमागरम खिचडी खायला हवी.
घरीच लहानश्या कुंडीत लावा लिंबांचं रोप; १० रूपयांची 'ही' वस्तू कुंडीत घाला, भरपूर लिंबू येतील
संतुलित मॅक्रोन्युट्रिएंट्स
खिचडीतील तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे. या डाळीतून शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळते. खिचडी खाल्ल्यानं मांसपेशींना पोषक तत्व मिळतात.
लो ग्लायसेमिक इंडेक्स
खिचडीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. याचा अर्थ असा की ब्लड फ्लोमध्ये हळूहळू ग्लुकोज सोडलं जातं. ज्यामुले रक्तातील साखरेची वाढ रोखता येते. खिचडीचे नियमित सेवन केल्यानं ब्लड शुगर स्पाईक होण्यापासून रोखता येतं.
फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी
खिचडीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी एक चांगला पर्याय आहे. वेट मॅनेजमेंटसाठी हा उपयुक्त उपाय आहे. खिचडी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम आहार आहे.
आईबाबांना सुधा मूर्तींचा खास सल्ला, नियमित करा ३ गोष्टी-मुलं वाया जाणार नाहीत
पचनक्रिया चांगली राहते
खिचडीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. जे आतड्यांत हेल्दी बॅक्टेरियांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. पचनक्रियेत सुधारणा होऊन आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय संतुलित पचनक्रिया शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत करते.
प्रोटीनचा चांगला स्त्रोत
खिचडी बनवण्यासाठी मुख्य स्वरूपात डाळींचा वापर केला जातो. डाळ एक प्लांट बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. याचे सेवन केल्यानं तुम्ही दीर्घकाळ संतुष्ट राहू शकता. याशिवाय मांसपेशींचा विकास होण्यास मदत होते.