फ्रिजमध्ये उरलेलं अन्न ठेवणं अन्हेल्दी मानलं जातं. वारंवार फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खाल्ल्यानं पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात खाल्ल्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेले फिटनेस कोच राल्स्टन डिसूजा यांनी सांगितले की फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात का खावा. (Refrigerated Rice Healthier Than Freshly Cooked Rice It Can Be Control Diabetes And Reduce Extra Fat)
राल्स्टन यांच्यामते फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात खाल्ल्यानं शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. वजन कमी होण्यास मदत होते आणि पोटात चांगले बॅक्टेरियाज वाढतातत ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शिळा भात फेकण्याआधी नक्कीच विचार करा.
एक्सपर्ट्स सांगतात की याचा अर्थ असा नाही की ताजे शिवलेले तांदूळ चांगले नसतात. पण शिळ्या भातात अधिक पोषक तत्व असतात. ताज्या तांदूळाच्या तुलनेत शिळा भात लगेच पचतो. वजन कमी करण्यासही साहाय्यक ठरतो. शिळा भात तुम्ही ओव्हनमध्ये गरम करून खाऊ शकता, यामुळे त्याच्या गुणांवर काहीही परिणाम होत नाही.
चेहऱ्यावर पिंपल्स आलेत-डलनेस दिसतो? झोपताना हे तेल लावा, १५ दिवसांत दूर होतील पिंपल्स
कॅन्सरपासून बचाव होतो
रेजिस्टंट स्टार्च शरीरात फायबर्सप्रमाणे काम करतो. ज्यामुळे पोटात चांगले बॅक्टेरियाज वाढतात आणि पचनक्रिया चांगली राहते. कोलन कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होतो.
शरीरात रक्त कमी-अशक्तपणा आला? सद्गुरू सांगतात ४ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भराभर वाढेल
ब्लड शुगर नियंत्रणात राहते
एक्सपर्ट्सच्या मते शिजवलेले तांदूळ १२ ते २४ तास तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. ज्यामुळे त्यातील स्टार्च रेजिस्टेंट स्टार्चमध्ये बदलते. स्टार्चचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे ब्लड शुगरमध्ये चढ- उतार होत नाही. डायबिटीस आणि इंसुलिन रेजिस्टेंट असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.