Join us   

रात्री काही केल्या शांत झोपच येत नाही? डॉक्टर सांगतात, फक्त इतकंच करा, लागेल निवांत गाढ झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 11:54 AM

Remedies for Sound Sleep : रात्रीची झोप गाढ झाली असेल तर आपला दिवस एकदम फ्रेश जातो.

रात्री गादीवर पडल्या पडल्या झोप लागणारे लोक म्हणजे खरे सुखी असे आपण अनेकदा म्हणतो. याचे कारण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना रात्री झोप लागत नाही. यामागे आरोग्याच्या तक्रारी, कामाचा ताण, मोबाइलचे व्यसन अशी असंख्य कारणं असतात. पण दिवसाला आपली ७ ते ९ तास गाढ-शांत झोप झाली नाही तर आपल्याला दिवसभर अस्वस्थ वाटतं. इतकंच नाही तर पुरेशी झोप न झाल्याने आपल्याला थकवा आल्यासारखे होते. पण हेच जर रात्रीची झोप गाढ झाली असेल तर आपला दिवस एकदम फ्रेश जातो. पाहूया यासाठी कोणत्या १० गोष्टी करायच्या, जेणेकरुन वेळेत झोप येईल आणि झोप पूर्णही होईल (Remedies for Sound Sleep).

1. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. सुर्योदय होण्याच्या वेळी तुम्ही उठलात तर तुम्ही रात्रीही वेळेत झोपाल आणि झोप पूर्ण होण्यास मदत होईल. 

2. झोपताना कोमट दूध प्या. हळद/जायफळ घातलेले दूध घेतल्यास आतड्याला आणि मनाला शांतता मिळते आणि गाढ झोप येते. 

3. पर्यायी अनुनासिक श्वास घेण्याचा सराव करा यामुळे शांत होण्यास मदत होते.

4. पलंगावर स्क्रीन (फोन) वापरणे टाळा, स्क्रीनपासून दूर राहिल्याने मेलाटोनिन (झोप) हार्मोनचा स्राव होण्यास मदत होते.

5. आरामशीर शॉवर घ्या, त्यामुळे दिवसभराचा थकवा निघून जाण्यास मदत होते.

6. झोपताना पायांना मालिश करा, यामुळे उबदारपणा मिळून मेंदू आणि शरीराला आराम मिळण्यास मदत होते.

7. मनातल्या गोष्टी लिहून काढा, यामुळे मेंदुतील गोष्टी बाहेर पडण्यास मदत होईल आणि मनावरचाही ताण हलका होईल.

8. आयुर्वेदातील नस्य क्रिया करा. प्रत्येक नाकपुडीत गाईच्या तुपाचे 2 थेंब घातल्यास शांत झोप येण्यास मदत होईल आणि डोकेदुखी दूर होण्यासाठीही याचा चांगला फायदा होईल

9. तुमचा दिवस सुरू करण्याचा आणि शेवट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रार्थना. यामुळे मनाला शांती मिळण्यास मदत होईल.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल