Join us   

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी टूथपेस्टमध्ये मिक्स करा फक्त ४ पदार्थ, दात होतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2024 6:33 PM

Remedies for yellow teeth : How to Get Rid of Yellow Teeth : दातांच्या पिवळेपणामुळे हसण्या - बोलण्यावर बंधन येतात ? करा १ सोपा उपाय...

पांढऱ्याशुभ्र चमकदार दातांवर जेव्हा पिवळे थर जमू लागतात आणि तोंडातून यामुळे दुर्गंधी येऊ लागते तेव्हा ते कोणालाच आवडत नाही. दात पिवळे होऊ लागले तर अगदी खळखळून हास्यावरही बंधन लागल्यासारखे होते. याशिवाय आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. अशा वेळी बोलल्यावर किंवा हसल्यावर दाताचा पिवळेपणा दिसून येतो तेव्हा चारचौघात ते स्वतःला देखील आवडत नाही. पिवळे दात हे अनहेल्दी ओरल हेल्थचे लक्षण आहे. दातांवर पिवळा थर साचण्याची अनेक कारणे असू शकतात(Top Tips on How to Remove Yellow Stains From Teeth).

तुमचे दात काही कारणाने पिवळे पडू लागले असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. दातांची ट्रिटमेंट हीदेखील महाग असते. त्यामुळे सारखं सारखं यासाठी पैसे देणं नक्कीच खिशाला परवडण्यासारखं नाही. दात हा आपल्या (Struggling with Yellow Teeth? Here’s How You Can Whiten Them) सौंदर्याचा एक भाग आहे आणि त्यावर पिवळे थर जमू लागले तर नक्कीच लाजिवरणी अवस्था होते. पिवळे दात हे केवळ आपल्या लूकवरच वाईट परिणाम करत नाहीत तर तोंडाच्या, आरोग्याच्या इतर समस्यादेखील यामुळे होऊ शकतात. मात्र दातांवरील हा पिवळसर थर काढून टाकण्यासाठी आपल्या रोजच्या टूथपेस्टमध्ये फक्त ४ पदार्थ मिक्स करुन त्या पेस्टने दात घासल्यास दातांवरील पिवळा थर दूर होण्यास मदत मिळते(How to Remove Permanent Yellow Stains From Teeth).

साहित्य :- 

१. खोबरेल तेल - १ टेबलस्पून  २. हळद - १/२ टेबलस्पून  ३. टूथपेस्ट - १ टेबलस्पून  ४. लिंबाचा रस - १/२ टेबलस्पून  ५. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून 

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका छोट्या बाऊलमध्ये खोबरेल तेल घ्यावे.  २. या खोबरेल तेलामध्ये बेकिंग सोडा, हळद, लिंबाचा रस घालून हे मिश्रण मिक्स करुन घ्यावे.  ३. सगळ्यात शेवटी या तयार मिश्रणात आपण नेहमी वापरत असलेली टूथपेस्ट मिक्स करुन हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित कालवून घेऊन एकजीव करुन घ्यावे. 

१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...

त्वचेच्या समस्या अनेक, प्रत्येक  त्रासप्रमाणे कोरफड जेलमध्ये मिक्स करा हे ४ पदार्थ, स्किन प्रॉब्लेम्स होतील दूर...  ही तयार पेस्ट दातांसाठी कशी वापरावी ? 

सगळ्यात आधी ही पेस्ट तयार केल्यानंतर ही पेस्ट आपल्या नेहमीच्या टूथब्रशवर टूथपेस्ट सारखी लावून घ्यावी. ही पेस्ट ब्रशवर लावल्यानंतर या पेस्टने दात स्वच्छ घासून घ्यावेत. किमान १० ते १५ मिनिटे या पेस्टने दातांवर हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर खळखळून चुळ भरुन दात स्वच्छ करावेत. हा उपाय आठवड्यातून किमान दोनवेळा केला तरीही आपल्या दातांवरील पिवळा थर अतिशय सहजरित्या निघून जाऊ शकतो. 

या पेस्टचा वापर करण्याचे फायदे :- 

१. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा दात पांढरे करण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. NCBI च्या अभ्यासानुसार, बेकिंग सोडा प्रभावीपणे दातांमधील हट्टी टार्टर काढून टाकू शकतो आणि त्यांची नैसर्गिक चमक परत आणण्यास मदत करतो. 

२. खोबरेल तेल :- खोबरेल तेलामध्ये असलेले लॉरिक अ‍ॅसिड प्लाक निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून दात पांढरे करण्यास मदत करते.

३. हळद :- हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. हे घटक दातांवर जमा झालेला पिवळा थर काढून टाकण्यास मदत करतात.

४. लिंबाचा रस :- लिंबाचा रस दातांवर लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होऊन ते मजबूत होतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स