Join us   

तुम्हालाही सतत पाय हलवण्याची सवय आहे का? तुम्ही रेस्टलेस सिंड्रोमने आजारी तर नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 4:01 PM

Restless legs syndrome - Symptoms and causes सतत पाय हलवण्याची अनेकांना सवय असते पण त्याची कारणं काय? या सवयीचे दुष्परिणाम कोणते?

आपण बऱ्याचदा अनेकांना बसल्या - बसल्या पाय हलवताना पाहिलं असेल. अनेक लोकं उभं राहून देखील पाय हलवत असतात. त्यांच्यामध्ये स्थिरता पाहायला मिळत नाही. कदाचित ही सवय आपल्यालाही असू शकते. पण पाय हलवण्यामागे नेमकं कारण काय? याचा विचार आपण कधी केला आहे का? पाय हलवणे ही एक सवय नसून, एक आजार आहे. या लक्षणाला रेस्टलेस सिंड्रोम असे म्हणतात. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा, शरीरात लोहाची कमतरता भासते.

ही सवय १० टक्के लोकांमध्ये आढळून येते. ज्यात अधिकतर लोकं ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. यासंदर्भात, हार्वर्ड मेडिकल स्कूल, बोस्टनचे प्रोफेसर आणि या संशोधनाचे प्रमुख डॉ. डब्ल्यू. विंकमन सांगतात, ''या आजाराने ग्रस्त व्यक्ती झोपण्यापूर्वी 200-300 वेळा पाय हलवतात. सतत पाय हलवल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते''(Restless legs syndrome - Symptoms and causes).

रेस्टलेस सिंड्रोम म्हणजे काय?

हा मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे. पाय हलवताना व्यक्तीमध्ये डोपामाइन हार्मोन बाहेर पडते, ज्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा पाय हलवत राहावे असे वाटते. याला स्लीप डिसऑर्डर असेही म्हणतात. झोपेअभावी त्याला थकवा जाणवतो. अशावेळी ब्लड टेस्ट केली जाते. निद्रानाशाची समस्या वाढल्यास पॉलीसोमनोग्राफी (पीएसजी)ची तपासणी केली जाते. या तपासणीतून निद्रानाशाची कारणे समोर येतात.

कारण

हा आजार लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवते. याशिवाय किडनी, पार्किन्सन्स पिडीत रुग्ण व गर्भवती महिलांमध्ये प्रसूतीच्या शेवटच्या दिवसांमध्ये हार्मोनल बदल घडतात, याचे कारण रेस्टलेस सिंड्रोम असू शकते. अधिक दारूचे सेवन व काही औषधांच्या ओव्हरडोजमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. शुगर, बीपी आणि हृदयाच्या संबंधित ग्रस्त रुग्णांमध्ये त्याचा धोका वाढतो.

५ पदार्थांसोबत खा चिमूटभर हळद, तब्येतीच्या अनेक समस्या होतील कमी

उपचार

उपचार म्हणून लोहयुक्त औषधे दिली जातात. जे निद्रानाश दूर करते आणि आरोग्याची स्थिती सामान्य करते. खास व्यायाम जसे की हॉट व कोल्ड बाथ, वाइब्रेटिंग पॅडवर पाय ठेवल्याने देखील आराम मिळतो.

कांदा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते का? संशोधन सांगते..

लक्षणं

पायात मुंग्या येणे किंवा मुंग्या चालल्यासारखे वाटणे. दिवसा बसताना पाय थरथरणे. थकवा येणे, इतरांकडून पाय वारंवार चोळून घेणे. 

या सवयी आजच बदला

1. रात्री झोपण्यापूर्वी किंवा अंथरुणावर झोपताना पाय हलवणे चांगले नाही. पाय हलवणार्‍या व्यक्तीबद्दल असे म्हटले जाते की, तो स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबातील सदस्यांचा जास्त विचार करतो. असे केल्याने व्यक्तीच्या आत नकारात्मक विचारांना ऊर्जा मिळते, जे सकारात्मक विचारांवर वर्चस्व गाजवते. अशी व्यक्ती आपल्या कामात निराश राहते. व यश गाठण्यास त्रास होतो.

2. ज्या व्यक्तीला जास्त काळजी असते, त्याला पाय हलवण्याची सवय लागते. घर आणि कुटुंबाची जास्त काळजी घेणारे बहुतेक लोकं झोपताना पाय हलवताना दिसतात. त्यामुळे पायांवर कंट्रोल ठेवा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य