Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

Rice or Oil what avoid in weight loss? : वजन कमी करताना भात खाणं टाळावं की तेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 07:55 PM2024-08-13T19:55:07+5:302024-08-13T19:56:29+5:30

Rice or Oil what avoid in weight loss? : वजन कमी करताना भात खाणं टाळावं की तेल?

Rice or Oil what avoid in weight loss? | वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

वजन कमी करण्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा सर्वात आधी डाएटवर फोकस करतो (Weight Loss). वजन जेवढ्या झपाट्याने वाढते, तेवढंच कमी करताना नाकीनऊ येतात (Rice or Oil). वजन कमी करणं हे खरंच खायचं काम नाही. व्यायामासोबत डाएटवरही तितकेच लक्ष द्यायला हवे. काही लोक वजन कमी करताना आहारात चपाती, भात आणि फ्राईड फूडही वगळतात.

पण आहारातून भात आणि तेल वगळल्याने खरंच वजन कमी होऊ शकतं का? वजन कमी करण्यासाठी आहारातून तेल वगळावं की भात? असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आलं असेल. वजन कमी करताना आहारातून भात वगळावा की तेल? पाहूयात(Rice or Oil what avoid in weight loss?).

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

वजन कमी करण्यासाठी आहारातून भात वगळावा की तेल?

भात

अनेकांना भाताशिवाय जमत नाही. भात खाल्ल्यानेच पोट भरते असं काहींचं म्हणणं आहे. पण वजन कमी करताना आहारातून भात वगळावा का? न्यूट्रिशनिस्ट मॅक सिंग यांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करताना भात आहारातून वगळू नका. तांदूळ लवकर पचते. शिवाय चयापचय दर सुधारण्यास देखील मदत करते. जितका चयापचय दर जास्त असेल, तितके वजन कमी करणे आपल्यासाठी सोपे होते. पण पोर्शन कण्ट्रोलमध्ये भात खावा.

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

तेल

वजन कमी करण्यासाठी आहारातून तेल पूर्णपणे वगळण्याची गरज नाही. मर्यादित प्रमाणात आपण सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करू शकता. डायटीशियन डॉ. व्ही.डी. त्रिपाठी सांगतात, 'सूर्यफूल तेलामध्ये ओलेइक ऍसिड, लिनोलिक ऍसिड, व्हिटॅमिन ई यांसारखे पोषक तत्व असतात. त्यात असलेले फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यास मदत करतात.' त्यामुळे आपण मर्यादित प्रमाणात सूर्यफुलाचे तेल वापरू शकता.

Web Title: Rice or Oil what avoid in weight loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.