Join us   

आज भात-उद्या चपाती- असं केल्यानं खरंच वजन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, कधी आणि काय खायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 2:44 PM

Rice Vs Chapati: Which is healthier for weight loss? आठवड्यातून किती दिवस चपाती खावी किती दिवस भात, असं केल्यानं खरंच वजन कमी होतं?

लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. यामुळे इतर धोकादायक आजार उद्भवण्याचा धोकाही वाढतो. यासाठी व्यायाम आणि उत्तम आहार महत्वाचा. वेट लॉस करत असताना अनेक जण चपाती किंवा भात स्किप करण्याचा सल्ला देतात. मात्र आहारतज्ञांच्या मते, चपाती आणि भात या दोन्हींच्या पौष्टिक मूल्यांमध्ये फरक आहे. वजन कमी करण्यासाठी दोन्हींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. चपाती किंवा भात बंद केल्याने खरंच वजनावर फरक पडतो का? चपाती खावे की भात, याबाबतीत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.

यासंदर्भात, दिल्लीतील न्यूट्रिफायच्या संस्थापक पूनम दुनेजा म्हणतात, ''चपाती आणि भात दोन्ही पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या आहाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकतं. आपण आठवड्यातून 4 दिवस चपाती खाल्ल्यास 2 दिवस भात खा. चपाती आणि भाताच्या पौष्टिक मूल्यांमध्ये खूप फरक असते. मधुमेहासह गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. तसेच, वजन कमी करण्यासाठी कधीही उपाशी राहू नये, अन्यथा आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात''(Rice Vs Chapati: Which is healthier for weight loss?).

‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..

कोणत्या प्रकारची चपाती व भात फायदेशीर आहे?

आहारतज्ज्ञांच्या मते, ''वजन कमी करण्यासाठी, गव्हापेक्षा जास्त फायदेशीर नाचणी, ज्वारी आणि बाजरीची भाकरी आहे. त्यात फायबर आणि प्रथिनेही जास्त प्रमाणात आढळतात. ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून बनवलेल्या भाकऱ्या अतिशय पौष्टिक असतात. भातामध्ये आपण ब्राऊन राइस खाऊ शकता. दरम्यान आपल्या आहारात दोन्हीचे प्रमाण निश्चित केले पाहिजे.''

रबडी-जिलेबी खाल्ल्याने खरंच मायग्रेनचा त्रास कमी होतो? खरं-खोटं नक्की काय?

या लोकांनी खाऊ नये चपाती व भात

डायटीशियन पूनम यांच्या मते, ''चपातीमध्ये ग्लूटेन असते, तर भात ग्लूटेन फ्री असतो. ज्या लोकांना ग्लूटन इनटॉलरेंस किंवा ग्लूटन सेंसिटिव्हीटी आहे, त्यांनी चपाती कमी व भात जास्त खावा. मधुमेहग्रस्त रुग्णांनी भात कमी, व चपातीचे सेवन करावे. डायबिटिजग्रस्त रुग्णांनी भाताचे सेवन करू नये, अन्यथा वेटलॉसच्या नादात साखरेची पातळी बिघडू शकते. 

वजन कमी करण्यासाठी १० खास टिप्स

फायबरचे सेवन वाढवा. दररोज 40 ग्रॅम फायबर खा.

वेट लॉस करत असताना दररोज 2-3 लिटर पाणी प्या.

तुम्ही उभं राहून पाणी पिता? उभं राहून पाणी पिणे योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात..

आपल्या आहारातून साखर आणि मिठाचे सेवन कमी करा.

जंक फूड ऐवजी घरातील पौष्टीक अन्नाचे सेवन करा.

वजन कमी करत असताना उपाशी राहू नका.

धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहा.

नियमित व्यायाम करा, दररोज खाण्यापिण्याच्या भागावर नियंत्रण ठेवा.

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल