Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Right time for sun bath : 'व्हिटॅमिन डी'साठी कोवळ्या उन्हात बसा असे डॉक्टर सांगतात, पण योग्य वेळ कोणती? बघा सकाळच्या उन्हाचे 5 फायदे

Right time for sun bath : 'व्हिटॅमिन डी'साठी कोवळ्या उन्हात बसा असे डॉक्टर सांगतात, पण योग्य वेळ कोणती? बघा सकाळच्या उन्हाचे 5 फायदे

Right time for sun bath : सकाळचं ऊन नक्की कोणत्यावेळी घ्यायचं? जाणून घ्या थंडीत अंगावर ऊन घेण्याचे जबरदस्त फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:54 AM2021-12-27T11:54:49+5:302021-12-27T12:03:21+5:30

Right time for sun bath : सकाळचं ऊन नक्की कोणत्यावेळी घ्यायचं? जाणून घ्या थंडीत अंगावर ऊन घेण्याचे जबरदस्त फायदे

Right time for sun bath : 5 surprising benefits of take sunbath in winters | Right time for sun bath : 'व्हिटॅमिन डी'साठी कोवळ्या उन्हात बसा असे डॉक्टर सांगतात, पण योग्य वेळ कोणती? बघा सकाळच्या उन्हाचे 5 फायदे

Right time for sun bath : 'व्हिटॅमिन डी'साठी कोवळ्या उन्हात बसा असे डॉक्टर सांगतात, पण योग्य वेळ कोणती? बघा सकाळच्या उन्हाचे 5 फायदे

(Image Credit- quora.com)

डिसेंबर, जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते.  थंडीत जरा बरं वाटावं म्हणून लोक उन्हात उभं राहणं पसंत करतात. ऊन फक्त आपल्या शरीरालाच गरम ठेवत नाही तर योग्य प्रमाणात व्हिटामीन डी मिळवून देण्यासाठीही फायदेशीर ठरतं. (Winter Care Tips) तज्ज्ञांच्या दाव्यानुसार ऊन्हामुळे फंगल इन्फेक्शनसारख्या अनेक आजारांपासून लांब राहण्यास मदत होते. म्हणूनच तुम्हाला हिवाळ्यात ऊन सकाळ ऊन अंगावर  घेतल्यानं मिळणारे फायदे आणि योग्य वेळ सांगणार आहोत. (Right time for sun bath) 

१) व्हिटामीन डी

 सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेतल्यानं आजारांपासून लढण्यासाठी उपयुक्त ठरणारं व्हिटामीन डी मिळण्यास मदत  होते.  यामुळे हाडं मजबूत होतात. तर सांधेदुखी आणि हिवाळ्यातील वेदनांपासूनही आराम मिळतो.

२) चांगली झोप

सकाळचं ऊन घेतल्यानं मेलाटोनिन  हार्मोन तयार होतो. या हॉर्मोनमुळे तुम्हाला चांगली झोप मिळते.  याशिवाय मानसिक ताणही कमी होतो. 

३) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 

उन्हात बसल्यानं कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं.  हिवाळ्यात जवळपास १५ मिनिटं ऊन्हात बसणं शरीरासाठी चांगलं ठरतं. 

४) फंगल इन्फेक्शन

जर त्वचेवर कोणत्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन जाणवत असेल तर कोवळ्या उन्हात बसल्यानं फायदा होईल.  उन्हात बसल्यानं बॅक्टेरिअल, फंगल इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. सकाळचं ऊन त्वचेच्या समस्यांना लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

गंभीर आजारांवर उपचार

सुर्याच्या किरणांमध्ये काविळ सारख्या गंभीर आजारांना बरं करण्याची क्षमता असते. म्हणून  काविळ असलेल्या रुग्णांना काहीवेळ उन्हात बसण्याचा सल्ला दिला जातो.

ऊन नक्की कोणत्या वेळी घ्यायचं?

जर तुम्हाला सकाळी सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी घ्यायचं असेल तर तुम्ही ते सकाळी 8 वाजण्यापूर्वी 25 ते 30 मिनिटे घेऊ शकता. या वेळात तुम्हाला व्हिटॅमिन डी चांगले मिळेल. संध्याकाळी सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळवायचे असेल तर सूर्यास्ताच्या वेळी मिळवू शकता.
 

Web Title: Right time for sun bath : 5 surprising benefits of take sunbath in winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.