Join us   

गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना-पाय खूप दुखतात? ग्लासभर दुधात ४ पदार्थ घालून प्या; दुखणं होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 9:45 PM

Right Time To Drink Turmeric Milk : हळदीच्या दूधात चिमुटभर काळी मिरी मिसळल्यास घसादुखी आणि संक्रमणापासून लढण्यास मदत होते. 

हळदीचं दूध  ओव्हरऑल आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली होण्यास मदत होते याशिवाय शारीरिक वेदनांपासूनही आराम मिळतो. ज्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. कारण हळदीत एंटीइन्फ्लेमेटरी गुण असतात. एंटीऑक्सिडेंट्स, एंटीट्यूमर, एंटीसेप्टिक,  एंटीव्हायरल, कार्डियोप्रोटिक्टिव्ह, हेपटोप्रोटेक्टिव्ह गुण असतात. (Right Time To Drink With Health Benefits)

प्रोटीन कॅल्शियम शिवाय दुधात फॉस्फरस, व्हिटामीन ए, व्हिटामीन डी, रायबोफ्लेविन, नियासिन, पँटोथेनिक एसिड, कोबालाबिन, आयोडीन, पोटॅशियम, सेलेनियम आणि जिंक असते. यातील पोषक तत्व शरीराला फायदे देतात. हळदीशिवाय इतर मसाले तुम्ही दुधात मिक्स करून पिऊ शकता. ज्यामुळे शरीराला वेगवेगळ्या पद्धतीनं फायदा होतो. 

हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ कोणती

तुम्ही हळदीचं दूध सकाळी, संध्याकाळी कोणत्याही वेळी पिऊ शकतात. रात्रीच्यावेळी प्यायल तर यातील पोषक तत्व तुम्हाला पुरेपूर मिळतील. शरीरात या पोषक तत्वांचे अवशोषण होण्यास मदत होईल. दिवसभराचा थकवा कमी होईल आणि चांगली झोप येण्यासही मदत होईल.

दिवाळीत खा-खा खाल्लं, आता वजन वाढलं? ७ दिवसांत वजन कमी करण्याचे ५ उपाय, स्लिम व्हाल

यामुळे फक्त मांसपेशी मजबूत होत नाही तर रक्त शर्करा स्तर नियंत्रित होण्यास मदत होते. बदलत्या वातावरणात खोकला, फ्लू,  सर्दी पासून आराम मिळवण्यासाठी हळदीच्या दुधाच्या सेवन करायला हवे. रात्री हळदीचे दूध प्यायल्यानं हॉर्मोनल संतुलन चांगले राहते. अनियमित मासिकपाळीचा त्रास दूर करण्यासाठीही हा एक उत्तम उपाय आहे.

हळदीच्या दुधात ४ पदार्थ मिसळा

1) जर तुम्हाला डायबिटीस, हृदयरोग, सांधेदुखी यांसारखे त्रास उद्भवत असतील तर हळदीच्या दुधात जायफळ मिसळून प्या.  

2) जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल किंवा रात्री पायांमध्ये ठणक येत असेल तर दुधात काजू मिसळून याचे सेवन करा.

सद्गुरू सांगतात नियमित 'या' तांदूळाचा भात खा, भरपूर प्रोटीन मिळेल-कॅन्सरचा धोकाही टळेल

3) जर तुम्हाला कमी एनर्जी असल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही यात हालिम मिसळून पिऊ शकता. 

4) हळदीच्या दूधात चिमुटभर काळी मिरी मिसळल्यास घसादुखी आणि संक्रमणापासून लढण्यास मदत होते.  जर तुम्हाला डेअरी  उत्पादनांपासून पूर्णपणे लांब राहायचे असेल तर तुम्ही संध्याकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान चिमुटभर हळद, सुकं खोबरं आणि गूळाचे सेवन करू शकता.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स