Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घासताना १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात

वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घासताना १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात

Right way To Clean Teeth : दातांची स्वच्छता करताना जीभ स्वच्छ करायला विसरू नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 01:52 PM2024-10-06T13:52:58+5:302024-10-06T15:18:59+5:30

Right way To Clean Teeth : दातांची स्वच्छता करताना जीभ स्वच्छ करायला विसरू नका.

Right way To Clean Teeth : How To Clean Teeth Properly By American Dental Association | वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घासताना १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात

वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घासताना १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात

दातांना हेल्दी ठेवण्यासाठी योग्य पद्धतीनं ब्रश करणं गरजेचं आहे. कारण दात निरोगी ठेवण्याासठी  खाणं-पिणं उत्तम असणं गरजेचं असतं. दात निरोगी ठेवण्यासाठी ब्रश कसं करता ते फार महत्वाचे असते. ब्रश करण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया. ज्यामुळे तुमचे दात मोत्यांसारखे चमकतील. (Teeth Care Tips) दातांवर पिवळे डाग पडू नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. (How To Clean Teeth Properly By American Dental Association)

अमेरिनक डेंटल असोशिएशनच्या (ADA) रिपोर्टनुसार सॉफ्ट ब्रिस्टलच्या ब्रशचा वापर केल्यास प्लाक काढून टाकण्यास मदत होते.  लहान तोंड असलेला टूथब्रश सर्व भागात अधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतो.  त्यासाठी इलेक्ट्रीक टुथब्रश हा चांगला पर्याय आहे. ब्रश केल्यानं दातांतील प्लाक आणि बॅक्टेरियाज निघून जाण्यास मदत होते. व्यवस्थित ब्रशिंगची टेक्निक वापरल्यास दातांना किड लागत नाही आणि आजारांपासूनही बचाव होतो. 

वजन कमीच होत नाही? पाळी येऊन गेल्यानंतर १० दिवस हे पदार्थ खा; कमी होईल वजन

ब्रश करण्याची योग्य पद्धत (Which Is Right Way To Brush) 

ब्रश करण्यासाठी जास्त मुलायम किंवा जास्त हार्ड ब्रशचा वापर करू नका. ब्रश करण्याासाठी आधी सर्क्युलर मोशनमध्ये दातांवर फिरवा. ४५ डिग्री वाकडं करून नंतर ब्रश केल्यास दात व्यवस्थित साफ होतील. ब्रश करताना जवळपास २० वेळा आपल्या दातांना गोलाकार फिरवा. 

ब्रश केल्यानंतर हे काम नक्की करा

दातांची स्वच्छता करताना जीभ स्वच्छ करायला विसरू नका. पेस्टमधील फ्लोराईडमुळे जीभेवरील बॅक्टेरियाज साफ होतील. यासाठी तुम्ही फ्लॉसिंग सुरू करा. यामुळे दातांच्यामध्ये अडकलेली घाण निघून जाण्यास  मदत होईल आणि दात स्वच्छ आणि क्लिन दिसतील. या पाण्यानं तुम्ही गुळण्या करू शकता. 

Navratri Special : नवरात्रीत 5 मिनिटांत काढून होतील पट्टीच्या रांगोळी डिजाईन्स; लक्ष्मीच्या पाऊलांनी सजवा दार

जांभूळाची साल वाटून याची पावडर तयार करा. नंतर यात सैंधव मीठ आणि काळी मिरी घालून मिक्स करा. नंतर एका डब्यात स्टोअर  करून घ्या. नंतर या चुर्णानं व्यवस्थित ब्रश करा. ज्यामुळे तुमचे दात मजबूत राहण्यास मदत होईल. याशिवाय लिंबाच्या रसात ते चूर्ण आणि मीठ मिसळून दात स्वच्छ करा. ज्यामुळे हलणारे दात मजबूत होण्यास मदत होईल. 

टुथब्रश हिरड्यांच्या ४५ अंश कोनात ठेवा. लहान स्ट्रोक्समध्ये ब्रश हळूवारपणे पुढे-मागे न्या, बाहेरील भाग, आतील भाग आणि दातांच्या चघळण्याच्या भागावर ब्रश करा. समोरच्या दातांतील भाग स्वच्छ करण्यासाठी ब्रश तिरपा करा नंतर वर-खाली स्ट्रोक करा.

Web Title: Right way To Clean Teeth : How To Clean Teeth Properly By American Dental Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.