दही (Curd) तब्येतीसाठी बरेच फायदेशीर ठरते. अनेकजण थंडीच्या वातावरणात दही खातात. दही हे थंड असते. बरेच लोक थंडीच्या वातावरणात दही खाणं टाळतात. बऱ्याच लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की थंडीच्या दिवसांत दही खावं की खाऊ नये (How To Eat Curd In Right Way How To Eat In Winter). यामुळे तुमच्या शरीराला फायदा किंवा नुकसान होऊ शकते. थंडीच्या दिवसांत दही खाणं फायदेशीर ठरतं पण अनेकदा हे नुकसानकारकही ठरू शकतं. दही खाण्याचे फायदे समजून घेऊ (Right Way To Eat Curd)
दही खाण्याचे फायदे
दह्यातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. यामुळे गॅस, एसिडीटी आणि इतर पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. दह्यातील प्रोबायोटिक्स इम्यून सिस्टीम मजबूत बनवतात आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.
दह्यातील कॅल्शियम हाडांना मजबूत बनवते आणि ऑस्टिओपॅरोसिससारख्या आजारांचा धोका टळतो. दह्यात प्रोटीन असते ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
दह्यात लॅक्टिक एसिड असते ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम, चमकदार बनते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यातील बॅक्टेरिया हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात.
हिवाळ्यात दही कसे खावे
हिवाळ्यात हिंग, जीरं, काळी मिरी दह्यात मिसळून खाऊ शकता. दह्यात तुम्ही केळी मिसळून खाऊ शकता. दह्यात ओट्स मिसळूनही खाऊ शकता. दही आणि सूप मिसळून खाल्ल्यानंही फायदे मिळतील. ज्यामुळे शरीर थंड ठेवण्यास मदत होते. मात्र रात्री दही खाल्ल्यानं कफची समस्या वाढते आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.