भारतीय लोकं आवडीने भाजलेले चणे (Roasted Chana) खातात. मुठभर भाजलेले चणे खाल्ल्याने छोटी भूक भागते, शिवाय दीर्घकाळ भूकही लागत नाही. काळ्या चण्याचा वापर विविध पदार्थांमध्ये होतो. त्यातील पौष्टीक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आर्यन, फायबर आणि व्हिटामिन असते. ज्यामुळे शरीराला काम करण्याची उर्जा तर मिळतेच, सोबत अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. जर आपल्याला महागडे प्रोटीनयुक्त पदार्थ खरेदी करण्यास परवडत नसेल तर (Protien Rich Food), आपण भाजलेले चणे खाऊनही शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढू शकता.
फॅट टू स्लिमचे संचालक आणि पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, 'चणे भाजल्याने त्यातील पोषक घटक कैक पटीने वाढतात. शिवाय आपण काळे चणे भाज्यांमध्येही घालून खाऊ शकता. पण मुठभर भाजलेले चणे खाल्ल्याने याचा अधिक फायदा शरीराला होतो. भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळते, शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढते'(Roasted Chana (Chick Peas) A Protein Rich Snack).
प्रोटीनचा खजिना
भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. शिवाय ते भाजल्याने त्यातील पोषक तत्वांवर अजिबात परिणाम होत नाही. शरीरातील नवीन पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते, जी वाढ आणि विकासाला चालना देते. त्यामुळे नियमित मुठभर भाजलेले चणे खा.
भिजवलेले की भाजलेले? बदाम कधी आणि कसे खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो?
वजन कमी करण्यास मदत
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 'भाजलेल्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. अशावेळी आपण उलट सुलट पदार्थ खाणं टाळतो. याशिवाय फायबर पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.'
मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ महुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. भाजलेले चणे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांपैकी एक आहे. चण्याची जीआय लेव्हल २८ इतकी आहे. त्यामुळे भाजलेले चणे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
भात खाल्ला की सुस्ती येते? भात खाऊनही झोप यायला नको तर लक्षात ठेवा १ गोष्ट
हाडांसाठी फायदेशीर
भाजलेले चणे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एनसीबीआयने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, भाजलेल्या चण्यांमध्ये असलेले मॅंगनीज आणि फॉस्फरस हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. शिवाय त्यांना मजबूत करतात.
बॅड कोलेस्टेरॉल करते कमी
भाजलेल्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे नियमित सेवन केल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित कार्य करते. शिवाय हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.